Published on
:
07 Oct 2024, 2:19 pm
Updated on
:
07 Oct 2024, 2:19 pm
पुणे : पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करण्याचे काम कष्टकरी महिला वर्गाकडून करण्यात येते. शहर स्वच्छ व सुंदर राहण्यामध्ये स्वच्छता कर्मचार्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी केले. तसेच, झोपडपट्टी असो वा उच्चभ्रू सोसायटी कोणी पैसे दिले नाही म्हणून कचरा घ्यायचा नाही, असे कर्मचार्यांनी करू नये. त्यांचा कचरा घेतल्यास नंतर त्यांना तुमच्या कष्टाची जाणीव होईल. व ते पैसे देण्यास सुरूवात करतील. त्यामुळे, तुमची सेवा अखंडीत राहील, असेही कदम यांनी नमूद केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात पुणे महानगरपालिकेतील स्वच्छ फाउंडेशन स्वच्छता कर्मचार्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी महापालिकेतील सफाई कर्मचार्यांच्या सन्मानासह त्यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील यावेळी उत्साहात आयोजित करण्यात आले. यावेळी महिला कर्मचार्यांनी मनोगतही व्यक्त केले.