मी मंत्री झालो तर काही लोकांच्या पुन्हा पोटात दुखू लागले.निवडणुकीत संजना जाधव यांना पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापराभवासाठी पैसे पुरवले. बांगड्या भराकशाला राजकारण करता. आमच्या नादालालागाल तर आमच्यात शिवसैनिक जिवंतआहे. आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणारनाही, अशी टीका पालकमंत्री संजय शिरसाटयांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केली.पालकमंत्री झाल्यानंतर शिरसाट यांचा सोमवारी नागरी सत्कारकरण्यात आला, यावेळी ते बोलत होते. संत एकनाथ रंगमंदिरात सत्कार सोहळा पार पडला. अब्दुलसत्तार यांनी निवडणुकीत त्रास दिला, तर संजय शिरसाट आणिरमेश बोरनारे यांनी मदत केल्याचे आमदार संजना जाधवम्हणाल्या. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनीही अब्दुल सत्तारांवरटीका करत त्यांनी पश्चिम मतदारसंघात शिरसाट यांनापाडण्यासाठी त्रास दिल्याचे सांगितले. यावेळी आमदार प्रदीपजैस्वाल, आमदार संजना जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षकैलास पाटील आदी उपस्थित होते. एमआयएमची कीड संपवली शहरात काही लोक शेर आला शेर आला म्हणतहोते. मात्र ती एमआयएमची कीड आम्ही संपवली.जैस्वालांमुळे त्यांना मध्य सोडून जावे लागले होते.आता बटनचा कार्यक्रम करायचा आहे. इथल्यालेकीबाळीवर कोणी हात टाकायचा प्रयत्न केलातर त्यांना जोरदार धोपटा असे शिरसाट म्हणाले.खैरेंबाबत बोलताना ते म्हणाले की आधी खैरेसांस्कृतिक मैदानावर पाया पडायचे, आता इथेपाया पडतात अशी टीका शिरसाट यांनी केली. उठाव कसा करायचा? हे शिका उठाव कसा करायचा? आमदार कसे सोबत घ्यायचे? हे त्यांनी आमच्याकडून शिकावे, असा सल्लाही शिरसाट यांनी संजय राऊत यांना दिला आहे. त्यामध्ये आम्ही मास्टर आहोत. केवळ एका ठिकाणी बसून बडबड करून आमदार इकडचे तिकडे जात नसतात, हे कळायला तुम्हाला अजून भरपूर वेळ आहे. त्यामुळे तुमची केवळ कीव येते. 'किव' हा शब्द तुमच्यासाठी लागू होतो, अशा शब्दात शिरसाट यांनी राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उदय सामंत यांच्याकडे 20 आमदारांचा गट नाही तर 60 आमदारांचा गट असल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. आम्ही सर्वजण एकत्रच आहोत, असा दावा देखील त्यांनी केला. 'बालिशपणा' हा एकमेव शब्द संजय राऊत यांना लागू होतो, अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी उदय सामंत यांच्या विषयी केलेल्या दाव्यालाही त्यांनी फेटाळून लावले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)