संत रविदास महाराजांच्या नावाने विद्यापीठ सुरू करा:राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी; १ ऑक्टोबरला काढणार माेर्चा, नियोजन बैठकीत निर्णय‎

2 hours ago 2
संत रविदास महाराजांच्या नावे विद्यापीठ सुरू करा; महामंडळाचे थकीत कर्ज माफ करा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे १ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत अकोल्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईसह राज्यातील गटई कामगारांना पीचपरवाने त्वरीत देण्यात यावेत, राज्यातील गटई कामगारांना स्टॉल त्वरित वाटप करण्यात यावेत, चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांना अस्वच्छ व्यवसायाची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी. सर्व जिल्ह्यांमध्ये संत रविदास भवनसाठी जागा उपलब्ध करून देऊन भवन बांधून देण्यात यावे आदी मागण्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मुंबईत आझाद मैदान येथून मोर्चाचे आयोजन केले आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, विदर्भ प्रमुख संभा वाघमारे, गोविंद माऊली पार्डीकर, मुरलीधर ठोंबरे, गजानन भटकर, प्रतिभा शिरभाते, लीना चिम, रामाभाऊ उंबरकर, अकोला जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे, सुनील गवई आदींनी बैठकीत केले. या आहेत महासंघाच्या विविध मागण्या संत रोहिदास चर्मोउद्योग, चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्ज प्रकरणे माफ करण्यात यावे. संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करण्यासाठी १०० एकर जमीन व निधी त्वरीत देण्यात यावा. संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी. बार्टीच्या धर्तीवर संत रविदास कौशल्य विकास महामंडळ स्थापन करून स्वतंत्रपणे केंद्रे सुरू करण्यात यावे. संत रविदास चमोद्योग व चर्मकार विकास महामंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नेमण्यात यावे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात असलेले कंत्राटी तत्त्वावरील कर्मचारी रद्द करून चर्मकार समाजाच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला मुंबई येथे प्रशस्त मुख्य कार्यालय देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article