संतोष देशमुखप्रकरणापेक्षाही गुंड्या गायकवाडांचा खून… गुणरत्न सदावर्तेंचा सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप काय?

2 hours ago 1

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर अनेक प्रकरण समोर येत आहेत. त्यातच आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील गुंड्या गायकवाड यांच्या हत्येबद्दल प्रश्न उपस्थितीत केले आहेत. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हा देश संविधानावर चालतो. कोणाची जात उच्च आणि नीच आहे, अशी कोणतीही तरतूद या संविधानामध्ये नाही. आरोपी हा आरोपी आहे, मग तो कोणीही असो कोणत्याही जाती धर्माचा असो आरोपी हा आरोपी असतो. भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील गुंड्या गायकवाड साहेब यांचा जो खून झाला, हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील गंभीर आहे. कशाप्रकारे हत्यारे तयार करण्यात आली ते धस यांचे शेत होतं का? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

सुरेश धस यांच्या पत्नीने तीन लाख रुपये पाठवले होते, ती रक्कम जप्त होते. केंद्र हे तपासातील अधिकारी ते मेन विटनेस आहेत. ते डंके की चोट पे सांगत आहेत धस यांना आज देशमुख प्रकरणावर बोलण्यासाठी तोंड राहिलेले नाही. धस कोण आहेत हे मराठा समाजाचे आहेत. उच्च जातीचे आहेत. ते तत्कालीन मंत्री होते हे काहीही मायने राखत नाही. त्यांच्या कुटुंबाचे इन्व्हॉलमेंट गुंड्या गायकवाड मर्डर केसमध्ये असेल तर बाबतीत पूर्णपणे छडा लागला पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

पोलीस अधिकारी केंद्रे यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे घेऊन गेले पाहिजे. सुरेश धस यांच्या पत्नीने आरोपीला तीन लाख रुपये केसमधून काढता पाय घेण्यासाठी दिली असेल, हत्यारे धसांच्या शेतातून जप्त केले असतील, आरोपीला पकडण्यापासून मज्जाव केला असेल तर त्यांचे इन्वॉलमेंट आहे, असाही गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article