राज्य अजिंक्यपद तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या मल्लांच्या डावपेचांनी कुस्तीचे सामने रंगतदार होत आहेत. संबळ, हलगी अन् तुतारीच्या सुरांत कुस्त्या लावल्या जात आहेत. वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेला बलभीम अण्णा जगताप मैदानावर २९ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. मैदानावर कुस्ती लावण्यासाठी उपस्थित मान्यवर हलगी, तुतारीच्या सुरात मैदानावर पोहोचून कुस्त्या लावत आहेत. महाराष्ट्र कुस्ती पात्रता पहिल्या फेरीला सुरूवात झाली. माती विभागात सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरूद्ध पुणे शहराचे तानाजी झुंजर्कर यांच्या लढतीत, गायकवाडने विजयी सलामी दिली. गुरुवारी गादी व मातीवर सुमारे ५५ कुस्त्या झाल्या, असे कुस्तीगिर संघटनेचे पदाधिकारी शिवाजी चव्हाण यांनी सांगितले. माती व गादीवर गुरुवारी ५५ कुस्त्यांचा थरार पहायला मिळाला. नामवंत पहिलवानांनी दाखवलेल्या कुस्ती कौशल्यामुळे कुस्त्यांचा थरार चांगलाच रंगला माती गटात रोमांचक लढतीत एकरीपट काढण्याच्या प्रयत्नात मल्ल. छाया : सिद्धार्थ दीक्षित
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)