संयुक्त गट ‘ब’ आणि ‘क’च्या आता स्वतंत्र परीक्षा ; राज्य लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

10 Oct 2024, 5:01 am

Updated on

10 Oct 2024, 5:01 am

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत घेण्यात येणारी गट ब आणि गट क ची संयुक्त परीक्षा एकत्र घेण्यात येत होती. परंतु या पुढील काळात गट ब आणि गट क ची संयुक्त परीक्षा वेगवेगळी घेण्याचा निर्णय एमपीएससीमार्फत घेण्यात आला आहे. दोन्ही परीक्षा स्वंतत्र झाल्यामुळे राज्यातील लाखो परीक्षार्थींनी संधी मिळणार असल्याचे स्पर्धा परीक्षार्थींनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा परीक्षेसाठी दि. 19 जानेवारी, 2023 रोजी परीक्षा योजना प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षा योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन दोन्ही सेवेची संयुक्त पूर्व परीक्षा प्रथमतः आयोजित करण्यात आली होती. परंतु निकाल प्रक्रियेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी व उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे आणि निकाल प्रक्रियेस होणारा विलंब आदी बाबी विचारात घेऊन या परीक्षा योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला.

एमपीएससीने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र परीक्षा घेतल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. दोन्ही परीक्षा एकत्र घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संधी कमी झाल्या होत्या. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत होता. आता दोन्ही परीक्षा स्वतंत्र झाल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल एमपीएससी आयोग आणि राज्य सरकारचे आभार.

महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट - क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या दोन्ही परीक्षांच्या जाहिराती एमपीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. गट ब साठी 480 पदाची व गट क साठी 1333 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गट - ब : पोलीस उपनिरीक्षक - 216, राज्य कर निरीक्षक- 209, सहाय्यक कक्ष अधिकारी- 54

गट - क : लिपिक टंकलेखक - 786, कर सहाय्यक - 482, तांत्रिक सहाय्यक - 9, उद्योग निरीक्षक. - 39, बेलीफ व लिपिक गट - क नगरपाल (शेरीफ) - 17

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article