संविधान रक्षणासाठी पुणे काँग्रेसची भव्य रॅली:महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त 'जय बापू, जय भीम, जय संविधान' घोषणांनी शहर दुमदुमले

7 hours ago 1
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज भव्य रॅलीचे आयोजन केले. काँग्रेस भवन येथून सुरू झालेली ही रॅली लोकमान्य टिळक पुतळा आणि महात्मा फुले मंडई पर्यंत निघाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी काँग्रेस भवन येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी संविधानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, भारतीय संविधान हे देशातील सर्व जाती-धर्मांना एकत्र बांधणारे सूत्र आहे. राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्वधर्म समभाव आणि सामाजिक समता ही मूल्ये संविधानाने दिली असून ती आपली खरी ओळख आहे. त्यांनी काही धर्मांध शक्तींकडून संविधानाची होत असलेली मोडतोड रोखण्याचे आवाहन केले. रॅलीदरम्यान भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये मांडण्यात आली. भारत हा जगातील पहिला देश ठरला ज्याने स्वातंत्र्यानंतर लगेच महिलांसह सर्व प्रौढांना मतदानाचा हक्क दिला. देशातील ४,००० हून अधिक विविध समुदायांच्या परंपरा, संस्कृती, भाषा, जात, धार्मिक श्रद्धा आणि खाद्यसंस्कृतीचा उल्लेख करण्यात आला. या कार्यक्रमास माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय संविधान म्हणजे संतविचार-शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा संगम आहे. परंपरा, संस्कृती, भाषा, जात, धार्मिक श्रद्धा, खाद्यपदार्थ इत्यादींमध्ये वेगळेपण असलेल्या ४,००० हून अधिक समुदायांनी भारत देश बनलेला आहे. भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच महिलांसह सर्व प्रौढांना मतदानाचा हक्क दिला. काँग्रेस पक्षाच्या वतीने भारताचे संविधान वाचविण्यासाठी रॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी यावेळी शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या सह माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, मा नगरसेवक अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, मुख्तार शेख, सदानंद शेट्टी, अविनाश साळवे, कैलास गायकवाड उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article