Ashok Dhodi execution lawsuit : शिवसेना शिंदे गटातील नेते अशोक धोडी यांच्या हत्या प्रकरणाचे गुढ उलगडले आहे. त्यांची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर सख्ख्या भावानेच केली आहे. पोलिसांच्या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरपट्टीच्या वादातून लहान भावाने अशोक धोडी यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
का केली हत्या…
शिवसेना नेते अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. गुजरातमधील भिलाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत खाणीच्या पाण्यात त्यांची कार आढळून आली. त्यांची हत्या भाऊ अविनाश धोडी यानेच घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. या हत्या प्रकरणात मोठी उपडेट समोर आली आहे. घरपट्टीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
अविनाश धोडी यांचे घर गुजरात हद्दीत आहे आणि त्यांनी घराची घरपट्टी महाराष्ट्र हद्दीतील तलासरी तालुक्यातील वेवजे ग्रामपंचायतमध्ये लावली आहे. ती रद्द करावी अशा तक्रारी अशोक धोडी यांनी केल्या होत्या. त्यामुळे दोघा भावांत टोकाचा वाद निर्माण होऊन हे अपहरण आणि हत्या झाल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
हे सुद्धा वाचा
अविनाश धोडी हा दारू सप्लायर
अशोक धोडी हत्या अपहरण प्रकरणात 4 आरोपीना अटक केले आहे. 3 आरोपी हे फरार आहेत. त्यामध्ये अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी यांचा समावेश आहे. अविनाश धोडी हा दारू सप्लायर आहे. गुजरात मधील दमन, सिलवास, खानवेल परिसरातून दारू आणून तो तलासरी तालुक्यात सप्लाय करतो असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
अविनाश धोडी यांच्या घराची घरपट्टी आणि दारू सप्लायच्या अनेक तक्रारी या अशोक धोडी यांनी वारंवार केल्या होत्या. यावरून दोघा भावांत मागच्या 10 वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातून अविनाश धोडी याने एक वर्षांपूर्वी अशोक धोडी यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती पोलिसांच्या तपासतून समोर आली आहे.