सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश करण्यासाठी राबताहेत नवदुर्गा:जनतेच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून असतात रस्त्यावर

2 hours ago 1
अकोला पोलिस दलातील महिला या दिवस असो वा रात्र २४ तास जनतेच्या सुरक्षेसाठी घराबाहेर असतात. कुटुंबाच्या जबाबदारीसोबतच लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आहे. दंगल असो, मोर्चा असो, निवडणूक या बंदोबस्तासाठी तत्पर असतात. सणवार, शुभ कार्यालाही घरी राहणे त्यांना बहुतांश वेळा शक्य होत नाही. अशा या महिला पोलिस आपल्या कर्तव्याप्रती तत्पर आहेत. महिला-मुलींना कायद्याची माहिती देण्याचे काम ^उज्ज्वला इटिवाले १०वर्षांपासून पोलिस दलात आहेत. सध्या दामिनी पथकात कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी १९०० मुलींना दामिनी पथकाबाबत तसेच गुड टच बॅट टच बाबत व डायल ११२ बाबत माहिती दिली. ग्रामीण भागात महिलांना, मुलींना विश्वासात घेऊन मार्गदर्शन करणे, त्यांची कशी फसवणूक होऊ शकते व त्यापासून सावध कसे राहावे, सोशल मीडियाच्या वापरा संदर्भात माहिती देतात. - उज्ज्वला इटिवाले, पोलिस मोबाइलद्वारे आलेल्या तक्रारींची घेतात दखल ^संजीवनी नागरे या पोलिस दलात कार्यरत आहेत. केंद्र सरकारचे व राज्य सरकारच्या पोर्टलवर जसे की आपले सरकार २.० या क्रमांकावर मोबाइलद्वारे आलेल्या तक्रारीवर त्या काम करतात. महिला व पुरुषांसाठी हे पोर्टल काम करते. त्यावर आलेल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी त्यांना २१ दिवसाच्या आत एसपी ऑफीसमध्ये बोलावून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात येतात. - संजीवनी नागरे, पोलिस पोलिस दलात ३१ वर्षांपासून महत्वपूर्ण भूमिका ^संगीता वडनेरकर या ३१ वर्षापासून पोलिस दलात कार्यरत आहेत. नियंत्रण कक्षात आकस्मित घटनेच्या अनुषंगाने आलेली माहिती संबधित पोलिस ठाण्याला तातडीने देऊन त्यावर नियंत्रण आणण्याचे काम त्या करत आहेत. व्हीआयपींचा दौरा बंदोबस्त हाताळणे. महिलांविषयी काही घटना घडल्यास दामिनी पथकाला माहिती देऊन महिला अंमलदारांना पाठवून ती घटना हाताळण्याचे काम करत आहेत. - संगीता वडनेरकर, हेड कॉन्स्टेबल महिलांच्या मनातील पोलिसांची भीती दूर करतात ^ योगीता हरणे या जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत दामिनी पथकाद्वारे महिला व मुलींमध्ये जागृतीचे काम करतात. महिला मुलींच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर करणे तसेच महिलांच्या काही तक्रारी असल्यास त्या निवारण करणे, सतत गस्त करत असताना कुठे अनुचित प्रकार घडत असल्यास त्यासंदर्भात कारवाई करण्याचे काम त्या करत आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम त्या करतात. - योगीता हरणे, पोलिस मुलींच्या सुरक्षेसाठी करताहेत काम; शिक्षेसाठी प्रयत्न ^पूजा चौधरी या पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, कॉलेजामध्ये भेटी देऊन मुलींना कायद्याची तसेच गुड टच बॅड टच विषयी माहिती देतात. बॅड टच होत असेल तर आईला व शिक्षकांना आधी सांगावे, किंवा ११२ क्रमांकावर फोन करुन माहिती देण्यासंदर्भात माहिती त्या देतात. इतकेच नव्हे तर समाजातील वाईट प्रवृत्तींना कायद्याने शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करतात. - पूजा चौधरी, पोलिस

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article