सत्ताधाऱ्यांना चढलेला सत्ता आणि पैशांचा माज शिवसैनिक उतरवणार! – स्नेहल जगताप

2 hours ago 1

‘विद्यमान सत्ताधाऱ्यांना सत्ता आणि पैशांची मस्ती चढलेली आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत – पोलादपूर-माणगावची सुजाण जनता आणि सर्वसामान्य कट्टर शिवसैनिक त्यांचा माज उतरविल्याशिवाय राहणार नाही,’ अशा शब्दांत महाड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी घणाघात केला.

महाड-पोलादपूर-माणगाव तालुक्यातील पिंपरी- चिंचवड शहरवासीयांचा स्नेहमेळाव्यात महाड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप बोलत होत्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शिवसेना प्रवक्ते अनिश गाढवे, महिला आघाडीच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, स्वाती ढमाले, शहर समन्वयक योगेश बाबर, शहर संघटक संतोष सौंदणकर, नाना जगताप, धनंजय देशमुख, पद्माकर मोरे, अनिल मालुसरे, दिलीप भागवत, सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

जगताप म्हणाल्या, महाड नगरपरिषदेत नगराध्यक्षा म्हणून काम करीत असताना नगरपरिषदेची सुमारे 15 कोटींची इमारत कोणत्याही शासकीय मदतीशिवाय बांधली. तसेच सुमारे 300 कोटी रुपयांची विकासकामे असोत, नागरिकांसाठी एक लाख रुपयांचा विमा असो की ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत महाड शहराला मिळवून दिलेले पारितोषिक असो, माझे कामच माझी कर्तबगारी सिद्ध करण्यास पुरेशी आहे. त्यामुळे निवडणुकीत पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याने गोगावले यांच्या पायांखालची वाळू सरकली आहे.’

महाड-पोलादपूर मतदारसंघातील रुग्णालयातील सुविधांचा अभाव, एमआयडीसीतील कामगारांची होणारी कुचंबणा, बेरोजगारी, कंत्राटदारांची ससेहोलपट, एसटी डेपोची झालेली वाताहात यांमुळे गेल्या 15 वर्षांपासून आमदार असलेले गोगावले नेमके कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जाणार? त्यामुळेच गावोगावी मतदारांना मिक्सर, महिलांना साड्या आणि पैसे वाटत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,’ अशी टीका जगताप यांनी केली.

शहर उपप्रमुख सुधाकर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच चंद्रकांत धनावडे, गोविंद झांजे, मच्छिंद्र देशमुख, राजेंद्र पालांडे, बाळाराम कदम, सुहास कदम, विलास महाडिक, संजय दळवी, दीपक शिंदे, प्रकाश रिकामे, शंकर खेडेकर, दिलीप मोरे, प्रभाकर निकम, सुरेश निकम, नयन पालांडे, राजू जाधव, भरत शिंदे आदींनी मेळाव्याचे आयोजन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article