समुद्रातील सर्वात मोठा पूलPudhari File Photo
Published on
:
20 Nov 2024, 11:55 pm
Updated on
:
20 Nov 2024, 11:55 pm
बीजिंग : चीनमधील झुहाई याठिकाणी जगातला सर्वात मोठा सागरी पूल आहे. हा पूल हाँगकाँग आणि मकाऊ या तिन्ही ठिकाणांना जोडतो. या पुलावर दोन्ही बाजूला तिहेरी रस्ते असून तो समुद्रापासून 22.9 किलोमीटरवर आहे. तर समुद्राच्या खाली 6.7 किलोमीटरवर आहे. या पुलाचे खांब बांधण्यासाठी 4 लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या पुलाला भूकंपाचा धोका उद्भवू नये यासाठी त्यात विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे. 8 रिश्टर स्केलचा भूकंप आला तरीही या पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगितले जाते.
झुहाई येथून हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी चार तास लागतात. मात्र या पुलामुळे ही वेळ कमी होऊन अवघ्या पाऊण तासात हे अंतर कापले जाते. या पुलाच्या माध्यमातून चीन हाँगकाँग आणि मकाऊवर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप केला जातो. चीनमधील तीन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा पूल अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. 2003 मध्ये या पुलाची संकल्पना समोर आली. त्यानंतर प्रत्यक्षात 2009 मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात केली गेली. या पुलासाठी 17.3 अब्ज डॉलर इतका खर्च आला आहे. याच्या बांधणीचा खर्च हाँगकाँग, झुहाई आणि मकाऊ या तिन्हीच्या सरकारने मिळून केला आहे.