सर्वांचीच उत्कंठा शिगेला .:आज दुपारी 2 पर्यंत ठरणार आमदार; 160 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला, लोकशाही भवनात निवडणार अमरावती, बडनेराचा आमदार

4 hours ago 1
विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होणार आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघात १६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रत्येक मतदारसंघात कुठे दुहेरी, तर कुठे तिहेरी अशी चुरशीची लढत होणार आहे. विशेष म्हणजे एकाही मतदारसंघात कोणत्याच उमेदवाराला थेट कल दिसत नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना शनिवारी दुपारी १२ वाजताच पूर्णविराम मिळणार आहे. दुपारी १२ पर्यंत आपला आमदार कोण, हे जवळपास ९० टक्के स्पष्ट होणार आणि दीड ते २ वाजता आमदार कोण, यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निवडणूक यंत्रणेने वर्तवली आहे. जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, अचलपूर, मेळघाट, मोर्शी आणि धामणगाव रेल्वे असे आठ मतदारसंघ आहेत. अमरावती व बडनेराची मतमोजणी शहरातील लोकशाही भवनमध्ये, तर उर्वरित सहा मतदारसंघांची स्वतंत्रपणे सहा ठिकाणी होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी ८ पासून प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वाधिक २७ फेऱ्या धामणगाव रेल्वे मतदारसंघात तर सर्वात कमी २३ फेऱ्या तिवसा, अचलपूर आणि मोर्शी मतदारसंघासाठी होणार आहे. याचवेळी अमरावती, बडनेरा आणि दर्यापूरसाठी प्रत्येकी २५ फेऱ्या आणि मेळघाटसाठी २६ फेऱ्या होतील. दरम्यान प्रत्येकच मतदान केंद्रावर मतमोजणीची प्रशासकीय तयारी शुक्रवारी सायंकाळीच झाली. मतदान प्रक्रियेत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सकाळी ७ वाजण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचायचे आहे. अमरावती | विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (दि. २३) जाहीर होणार आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार नाही, मात्र विजयाची चाहुल लागणार आहे. तसेच विजयाची घोषणा झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी विना परवानगी रॅली काढू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यासंदर्भात सर्व पक्ष व संघटनांना पोलिसांनी नोटीसही बजावली असल्याचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकमल चौकात काहीसा गोंधळ झाला होता. तसा प्रकार या वेळी होऊ नये, म्हणून पोलिसांनी विना परवानगी रॅली, जल्लोषावर बंदी घातली आहे. कोणी परवानगी न घेता रॅली काढली किंवा सार्वजनिक ठिकाणी जल्लोष केल्यास पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार आहे. शहरातील सर्वच परिसरात पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. त्यामध्ये स्थानिक पोलिसांच्या तुलनेत केंद्रीय पोलिस दलाचे जवान अधिक राहणार आहे. याचवेळी पोलिसांकडून मतमोजणी केंद्राच्या बाहेर व शहरातील सर्व मुख्य ठिकाणी ड्रोनद्वारे पोलिसांची पेट्रोलिंग राहणार आहे. यासोबतच सोशल मीडियावर कोणीही काही आक्षेपार्ह पोस्ट किंवा व्हिडिओ टाकू नये, तसे आढळल्यास पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर पोलिसांची सातत्याने ‘सायबर पेट्रोलिंग’ सुरू आहे. अमरावती - सुलभा खोडके (महायुती), डॉ. सुनील देशमुख (मविआ), जगदिश गुप्ता (अपक्ष). बडनेरा - रवी राणा (महायुती), प्रीती बंड (अपक्ष), तुषार भारतीय (अपक्ष). तिवसा- ॲड. यशोमती ठाकूर (मविआ) आणि राजेश वानखडे (महायुती). अचलपूर - बच्चू कडू (प्रहार), प्रवीण तायडे (महायुती), बबलू देशमुख (मविआ). धामणगाव रेल्वे - प्रताप अडसड (महायुती), प्रा. वीरेंद्र जगताप (मविआ), नीलेश विश्वकर्मा (वंचित), दर्यापूर - कॅप्टन अभिजित अडसूळ (महायुती), गजानन लवटे (मविआ), रमेश बुंदिले (अपक्ष). मेळघाट - केवलराम काळे (महायुती), डॉ. हेमंत चिमोटे (मविआ), राजकुमार पटेल (प्रहार). मोर्शी - उमेश यावलकर (महायुती), गिरीश कराळे (मविआ), देवेंद्र भुयार (महायुती), विक्रम ठाकरे (अपक्ष). मतदारसंघ कर्मचारी टेबल अमरावती ९० २५ बडनेरा ९६ २६ तिवसा ७८ २१ दर्यापूर ९० २५ मेळघाट ६९ १९ अचलपूर ७८ २१ मोर्शी ८७ २४ धामणगाव ८१ २२ एकूण ६६९ १८३ दर्यापूर येथे मतमोजणी केंद्रावर तयारी सुरू होती. शहरात आज तगडा बंदोबस्त तीन डीसीपी, पाच एसीपी, २३ पीआय, ४८ एपीआय, पीएसआय, ६७६ पोलिस अंमलदार असे एकूण ७५५ पोलिस तसेच सीएपीएफ व एसएपीचे ३६० जवान तैनात राहणार आहे. याशिवाय मतमोजणी केंद्र परिसरात तगडा बंदोबस्त राहणार आहे. मतमोजणीसाठी कर्मचारी

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article