सिंघम पोलिस अधिकारी शिवदीप लांडेंचा राजीनामा केला नामंजूर:पाटणा पोलिस प्रशिक्षण केंद्रप्रमुखपदी केली नियुक्ती

2 hours ago 2
बिहारमधील मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडेंनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात जाणार किंवा महाराष्ट्रात िवधानसभा लढणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, शिंदेसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे जावई असलेल्या लांडे यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असून त्यांना बिहारमध्येच पोलिस महानिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. त्यांची बिहारमधील पाटणा पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील, असे म्हटले होते. मराठी माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले होते की, मी सेवेतून राजीनामा दिला आहे, पण पुढे काय करायचे ते ठरवलं नाही. तरीही ते राजकारणात जाणार अशा बातम्या रंगवण्यात आल्या होत्या. त्यांनी राजीनामा दिला तेव्हा ते पूर्णिया रेंजचे आयजी म्हणून कार्यरत होते. आता ते पाटणा पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहतील. दरम्यान, यापूर्वीही अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन राजकारणात प्रवेश केला होता. मात्र, लांडे यांचा राजीनामा नामंजूर केल्याने ते काय निर्णय घेतील, याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले होते शिवदीप लांडे राजीनाम्यानंतर लांडे यांनी म्हटले होते की, ‘प्रिय बिहार, गेली १८ वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. आज मी भारतीय पोलिस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील.’

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article