सिल्लोडला जन्म प्रमाणपत्रांमध्ये‎मोठा घोटाळा- किरीट सोमय्या:पालिका, उपविभागीय कार्यालयात 2 तास कागदपत्रे तपासली‎

2 hours ago 1
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी ‎‎सकाळीच सिल्लोड येथे उपविभागीय‎‎अधिकारी व नगरपरिषदेच्या ‎‎‎अधिकाऱ्यांची भेट घेऊन ‎‎‎संबंधित कार्यालयांकडून‎‎देण्यात आलेल्या जन्म ‎‎‎प्रमाणपत्रांची फेरतपासणी ‎‎‎करण्याची मागणी केली.‎सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालयाने‎दिलेल्या जन्म प्रमाणपत्रांत घोटाळा झाला‎असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला.‎ राज्यभरात १ लाखापेक्षा जास्त बांगलादेशी‎नागरिक वास्तव्य करीत आहेत, असा आरोप‎त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्या‎अनुषंगाने तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी‎दिलीप स्वामी यांची भेट घेऊन जिल्ह्यात १०‎हजारांपेक्षा जास्त बांगलादेशी व रोहिंगे‎वास्तव्यास असल्याचे त्यांनी सांगितले. यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सिल्लोड तालुक्यात ४७३० बांगलादेशी व‎रोहिंगे राहत असल्याचा आरोप त्यांनी केला‎होता. त्या अनुषंगाने सोमवारी (२० जानेवारी)‎सोमय्या सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी‎लतीफ पठाण यांच्या दालनात दोन तास ठिय्या‎मांडून होते. यादरम्यान त्यांनी उपविभागीय‎अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेल्या जन्म‎प्रमाणपत्रांच्या फाइलसोबत जोडलेल्या‎कागदपत्रांची तपासणी केली. सोमवारी‎सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे सिल्लोड पालिका‎कार्यालयात कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.‎ चौकशीची मागणी करणार ‎ संबंधित अधिकाऱ्यांना या फायलींसोबत‎प्रमाणित पुरावा नसल्याचे निदर्शनास आणून‎दिले. त्यामुळे अचानक देण्यात आलेल्या या‎जन्म प्रमाणपत्रांबाबत संशय निर्माण होत आहे.‎या प्रमाणपत्रांची खातरजमा करण्याची मागणी‎मी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे‎करणार आहे, असे त्यांनी सांगितले.‎ सिल्लोडमध्ये 4500 हजार बांगलादेशी काही दिवसांपूर्वी देशभर गाजत असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा आता थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात 10 हजार 68 बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, तर संभाजीनगर शहरात 2 हजार 448 तर सर्वाधिक 4 हजार 730 बांगलादेशी नागरिक हे एकट्या सिल्लोड तालुक्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्यांच्या प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article