सुंदर, भव्य शिवसृष्टीची उभारणी; छत्रपती शिवरायांचे आठवेल रूप:बार्शीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, शिवसृष्टीचे लोकार्पण

1 hour ago 1
बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून बार्शीत सुंदर व भव्य अशी शिवसृष्टीची उभारणी करण्यात आली आहे. या शिवसृष्टीत शिवप्रेमींना शिवचरित्र आठवेल, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले. जवाहर हॉस्पिटलच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण व शिवसृष्टीचे लोकार्पण आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यानंतर येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार देशमुख म्हणाले, ज्या वेळी मी पालकमंत्री होतो. त्यावेळी राऊत हे माजी आमदार होते. तेव्हाही त्यांची विकासकामांसाठी धडपड होती. नंतर आमदार झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरकारकडून मोठा निधी तालुक्याच्या विकासासाठी मिळवला. आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, यासाठी किती तळमळ, धडपड असावी, हे मी त्यांच्या रूपाने पाहिले आहे. आमदार राऊत धाकट्या भावासारखे माझ्या पाठीमागे राहिले. शिवाजी महाराजांनी रयतेवर कसे प्रेम करावे ही शिकवण दिली. त्यांचाच आदर्श घेवून आ. राऊत यांची वाटचाल आहे, असे गौरवोद्गार काढले. ज्यांचे नांव घेतल्यानंतर आपले रक्त सळसळते, त्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते होणे हे मी माझे भाग्य समजतो. आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, बार्शीत शिवसृष्टी व शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असावा, अशी तमाम शिवप्रेमींची भावना होती. त्यामुळेच पालिकेच्या माध्यमातून ही शिवसृष्टी उभारली. राज-विजय क्रीडा मंडळाने शिवसृष्टीत बसवण्यासाठी अश्वारूढ पुतळा भेट दिला. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासह सर्वच महापुरुषांचे पुतळे संकेश्वर उद्यानात बसवण्यात येणार आहे. अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले, परकीयांचे आक्रमण रोखण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आरमार उभारले. आरमार ही शिवरायांची देण असून, यातूनच प्रेरणा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मांदी यांनी देशाच्या नौदलासाठी भारतीय बनावटीच्या युध्दनौका दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आदर्श असून, शिवसृष्टीतील भित्तीशिल्पे व शिवरायांचा पुतळा सर्वांना प्रेरणा व स्फूर्ती देतील. बार्शीत छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचे अनावरण व शिवसृष्टीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते केले. छाया : बंटी काळे, बार्शी या वेळी राज-विजय क्रीडा मंडळाच्या वतीने पुतळा भेट दिल्याबद्दल अध्यक्ष विजय राऊत यांचा तसेच शिवसृष्टीचे काम केलेले विशाल लडगे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. पालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी आमदार राऊत यांच्या प्रयत्नातून ही शिवसृष्टी साकार झाल्याचे सांगून राऊत यांच्यासह यासाठी योगदान देणारे रावसाहेब मनगिरे, विजय राऊत यांचे त्यांनी आभार मानले. शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी तहसीलदार एफ. आर. शेख, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, नगरअभियंता विवेक देशमुख, माजी नगराध्यक्ष यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article