सुपर स्पेशालिटीमध्ये प्रथमच मेंडिबल फ्रॅक्चर रिडक्शन:सेमाडोह बस अपघातातील रुग्णावर सुपर स्पेशालिटीमध्ये फिक्सेशन शस्त्रक्रिया यशस्वी‎

2 hours ago 1
मेळघाटात १५ दिवसांआधी झालेल्या बस अपघातात जखमी महिला व एका ६ वर्षीय बालिकेवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे मेंडिबल फ्रॅक्चर रिडक्शन, फिक्सेशन शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली . त्यामुळे या दोन्ही रुग्णांना दिलासा मिळाला असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलद्वारे दिली . अशी शस्त्रक्रिया प्रथमच केल्याची माहितीही सुपर स्पेशालिटीद्वारे देण्यात आली. दोन्ही रुग्णांना सुपर स्पेशालिटीत आणले त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती मेळघाटात १ ऑक्टोबर रोजी सेमाडोह धारणी मार्गावर खासगी बस नदीत कोसळली होती. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यात २४ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते. त्यात ही महिला व ६ वर्षीय बालिकेचा समावेश होता. या दोघींचा रक्तदाब कमी झाला होता. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले होते.दोन्ही रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या जबड्यात फ्रँक्चर असल्याचे दिसून आले. त्यामुळे रुग्णाला वेदना सहन कराव्या लागत होत्या. प्रकृतीही चिंताजनक होती.त्यामुळे या दोन्ही रुग्णांवर सातत्याने लक्ष ठेऊन त्यांची काळजी घेण्यात आली. त्यांच्या चाचण्या केल्या . या चाचण्यांमध्ये जे शारीरिक दोष आढळले त्यांचे निर्मुलन करावे लागले. त्यानंतर ज्यावेळी या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर झाली. त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुपर स्पेशालिटीतील शल्य चिकित्सकांनी पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला. किचकट शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन ते तीन तास लागले. रुग्णाच्या जबड्यात फ्रॅक्चर असल्याने डॉक्टरांनी इन प्लांट केले. ही शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना फारच सावधगिरी बाळगावी लागली. यशस्वी शस्त्रक्रियेसह रुग्णाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभही देण्यात आला. डॉ. प्रीतिश पडगव्हाणकर, डॉ. भूषण मुंदडा, डॉ. रोहित मुंदडा, डॉ. तरडेजा, डॉ. अंकुश वानखडे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. राखी वानखडे, डॉ. अश्विनी मडावी, डॉ. माधव ढोपरे, डॉ. माधवी कासदेकर व महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मंदाने, डॉ. श्याम गावंडे यांनी ही शस्त्रक्रीया यशस्वीपणे केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article