सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम विरोधातील याचिका फेटाळली:म्हणाले - जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले तर गडबड!
1 hour ago
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. ईव्हीएममधील गडबडीमुळे मतमोजणीत घोळ झाल्याचा दावा मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशा मागणीची के.ए. पॉल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असे कसे होऊ शकते? असा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली. के.ए. पॉल यांनी ईव्हीएम संबंधित एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली. या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पी. बी. वराळे यांच्या खंठपीठासमोर सुनावणी पार पडली. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत एलॉन मस्क यांच्या ईव्हीएम मशीन बाबतच्या विधानाचा संदर्भही कोर्टात देण्यात आला. तसेच चंद्रबाबू नायडू आणि वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी देखील ईव्हीएमबाबत उपस्थित केलेल्या शंकाही कोर्टात सांगितल्या. जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले तर गडबड! मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी जेव्हा पराभूत होतात, तेव्हा ते म्हणतात ईव्हीएममध्ये छेडछाड केलीये. पण जेव्हा ते जिंकतात, तेव्हा ते काहीच म्हणत नाहीत. याकडे आपण कसे बघायचे? असा सवाल कोर्टाने विचारला. तसेच जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड नसते. पण, जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा ईव्हीएमसोबत छेडछाड झालेली असते. जगापेक्षा तुम्हाला वेगळे का नकोय?, असेही न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना विचारले. आव्हाड यांच्याकडूनही ईव्हीएमवर प्रश्न ईव्हीएम मशीनच्या गडबडीच्या माध्यमातूनच महाविकास आघाडीचा पराभव झाला असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ईव्हीएम मशीन विरोधात आम्ही आजच नाही तर या आधी पासूनच बोलत असल्याचे जितेंद्र आवड यांनी म्हटले आहे. ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड नक्कीच असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या विरोधात जन आंदोलन उभे करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)