सुरेश धसांकडून फडणवीसांचा 'देवेंद्र बाहुबली' उल्लेख:म्हणाले - आम्हाला केवळ त्यांच्याकडूनच अपेक्षा, उपसा सिंचन योजनेबाबत मानले आभार
2 hours ago
1
बीड जिल्ह्यातील आष्टी येथे उपसा सिंचन योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बहुप्रतिक्षित खुंटेफळ साठवण तलावाच्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी व बोगदा कामाचे भूमिपूजन, तसेच श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) येथील समाधी मंदिराचे भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या भाषणात बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा देवेंद्र बाहुबली असा उल्लेख केला. आम्हाला केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच अपेक्षा आहे, असे सुरेश धस म्हणाले. सुरेश धस म्हणाले, आष्टी तालुक्यातील या योजनेला विरोध करण्यात आला होता. आता आष्टी सिंचन योजनेचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते शुभारंभ होत आहे. मात्र ही योजना सुरू होत असताना येथील नागरिकांनी मला दगड मारले. अनेकांना हा प्रकल्प नको होता. मात्र, मी ठाम राहिलो आणि त्यासाठी नागरिकांचे मने वळवली. या योजनेसाठी रामदास कदम, प्रवीण दरेकर, प्रीतम मुंडे आणि नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी आम्हाला मदत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना सुरेश धस यांनी अध्यक्ष महोदय असा उल्लेख केला. मात्र यावर एकच हशा पिकला. कधी कधी आम्हाला सभागृहातच बोलत असल्याचे वाटते, असे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवींचा 'देवेंद्र बाहुबली' असा उल्लेख केला. सुरेध धस म्हणाले, 2014 मध्ये मी पडल्यानंतर 2024 पर्यंत खुंटेफळ साठवण तलावाचे केवळ 2 टक्के काम झाले. मी निवडून आल्यानंतर आतापर्यंत 23 टक्के काम झाले. देवेंद्र फडणवीस हे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातील पहिल्या पंपींग मशिनरीची एका दिवसात परवानगी दिली. त्यामुळेच हे काम शक्य होऊ शकले. 23.66 पैकी केवळ 7 टीएमसी पाणी मराठवाड्याला दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सभागृहात माझे नाव घेऊन या योजनेसाठी 300 कोटी रुपये दिले असल्याची माहिती देखील सुरेश धस यांनी दिली. आम्हाला केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच अपेक्षा आहे. केवळ देवेंद्र बाहुबली ते देऊ शकतात, असे देखील ते म्हणाले. प्रशांत बंब यांची योजना एका झटक्यात मंजूर केली. ते तुमचे लाडके आहेत, तसा मी देखील लाडका आहे. मला जायकवाडीतून 3.57 टीएमसी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्यावे, अशी मागणी सुरेश धस यांनी यावेळी केली. बीड प्रकरणावरही केले भाष्य
मी जिवंत असेल किंवा नसेल. मात्र या मतदारसंघात कायम भाजपचा आमदार निवडून येईल, असे देखील सुरेश धस ठामपणे म्हणाले. ठराविक राजकारणांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यामुळे जिल्ह्याची बदनामी झाली होती. मात्र संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली. त्यांनी घेतलेली भूमिका सर्वांना आवडली. या प्रकरणात कोणाला सोडणार नाही, या तुमच्या वक्तव्यावर सर्व जनतेचा विश्वास असल्याचे धस यांनी म्हटले आहे. राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मकोका लावला पाहिजे, अशी विनंती सुरेश धस यांनी यावेळी बोलताना केली. 'मेरे पास देवेंद्र फडणवीस है'
देवेंद्र फडणवीस यांनी मला भरपूर काही दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायम राहील, असेही सुरेश धस म्हणाले. सुरेश धस यांनी यावेळी 'दीवार' चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील डायलॉगचा दाखला दिला. लोक विचारतात 'तेरे पास क्या है'. मात्र 'मेरे पास देवेंद्र फडणवीस है', असे ते म्हणाले. यावेळी आपल्या आईची आठवण काढताना सुरेश धस हे भाऊक देखील झाले होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)