नगर : शिर्डी शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्री कोम्बिंग ऑपरेशन करून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित शिवाजी चाबुकस्वार (वय 23), अभिषेक संतोष पोटे (वय 22, दोघे रा. श्रीरामनगर, शिर्डी), रोहित बाळासाहेब धनवटे (वय 23, रा. नांदुर्खी रोड, शिर्डी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शिर्डी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना सराईत गुन्हेगार तपासणी व कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस अंमलदार मनोहर गोसावी, संतोष लोढे, गणेश भिंगारदे, सुरेश माळी, हदय घोडके, अमृत आढाव, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराज आत्तार, उमाकांत गावडे, अरुण मोरे यांच्या पथकाने नेमून शिर्डी येथे 3 फेब्रुवारीला रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यात संशयास्पद फिरणार्या तिघांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.