40 पेक्षा अधिक घराेडी केल्याचा ठपका
अमरावती (Amravati Burglary) : आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास अटक करण्यात पाेलीसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आराेपीवर 40 पेक्षा अधिक घराेडी केल्याचा ठपका आहे. ही (Amravati Burglary) कामगिरी फ्रेझरपुरा पाेलीसांनी बजावली आहे. आराेपी लाेकेश रावसाहेब सुतार (30, लिंगनूर ता. मिरज जि. सांगली व सुखदेव उफर् बंडू हनुमंत नाईक (28 वर्ष रा.आरग ता. मिरज जि. सांगली)अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.
याप्रकरणी ्रेजरपुरा हद्दीतील उमेश एकनाथ आगलावे (38 वर्ष रा. दिलखुश अपार्टमेंट, विश्रामभवन समाेर अमरावती) यांनी तक्रार दिली हाेती. तक्रारीनुसार घटनेच्या दिवशी गतवर्षी 31 ऑगस्ट राेजी ते खाजगी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले हाेते. यावेळी घराचा कुलूप ताेडून घरातील स्टडी रूम मधील लाकडी कपाटातील राेख रक्कम 2 लक्ष रूपयाचे अज्ञात चाेराने चाेरून नेले हाेते. या (Amravati Burglary) प्रकरणी फ्रेझरपुरा पाेलीसांनी चाेरीचा गुन्हा दाखल केला हाेता.
पाेलीसांनी याप्रकरणात परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तसेच आराेपी यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहनाची डिझाईन विशेष असल्याचे आढळून आले हाेते. तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. पाेलीसांनी या (Amravati Burglary) प्रकरणी हाॅटेल व लाॅजेस मधील ठेवण्यात आलेले रजिस्टर तपासले हाेते. यानंतर संशियत आराेपीची माहीती घेतली. यानंतर लाेकेश सुतार यांच्या घरी जाऊन शाेध घैण्यात आला. त्यास यापूर्वी सांगली, काेल्हापूर आदी ठिकाणी त्याचा शाेध घेण्यात आला हाेता. परंतु ताे आढळून आला नव्हता. आराेपी लाेकेश रावसाहेब सुतार (30, लिंगनूर ता. मिरज जि. सांगली याठिकाणी सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याजवळून चाेरण्यात आलेल्या दाेन लक्ष रूपयांपैकी 60 हजार रूपयाची राेकड जप्त करण्यात आली.
तसेच गुन्ह्यातील साथीदार सुखदेव उफर् बंडू हनुमंत नाईक (28 वर्ष रा.आरग ता. मिरज जि. सांगली) येथून यास अटक केली. सदरचा गुन्हा उघडकीस आणताना घटनास्थळावर काेणताही पुरावा नसताना सुद्धा उच्च दर्जाचे व्यवसायिक काैशल्य व तांत्रिक ज्ञानाच वापर करून ्रेजरपुरा पाेलिसांनी कामगिरी बजाविली. ही (Amravati Burglary) कारवाई पाेलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,उपायुक्त सागर पाटील, उपायुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकर, सहाय्यक आयुक्त कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली े्रजरपुराचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक निलेश करे, निरक्षक निलेश गावंडे, डीबी पथक प्रमुख पाेलीस उपनिरीक्षक राहुल महाजन, अंमलदार याेगेश श्रीवास, सुभाष पाटील, हरीश बुंदेले, शशिकांत गवई, हरीश चाैधरी, राेशन वराडे, जयेश परिवाले, चालक उमेश चुलपार यांनी केली.