संगीता कृष्णात माळीpudhari photo
Published on
:
05 Feb 2025, 5:12 pm
Updated on
:
05 Feb 2025, 5:12 pm
शिरोली एमआयडीसी : सोमवारी रात्री अंबप - कासारवाडी ( ता . हातकणंगले) या दरम्यान रस्त्यांवरून प्रवास करताना मोटारसायकल वरून पडल्याने नागाव ता. हातकणंगले येथील महिलेचा कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मयत महिलेचे नाव संगीता कृष्णात माळी ( वय ३९ ) असे असून हा अपघात सोमवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत माहिती अशी की, अंबप ता . हातकणंगले गावची यात्रा सुरू असल्याने संगीता माळी या पती व मुलगा यांच्यासोबत पाहूण्यांकडे सोमवारी रात्री जेवणासाठी गेल्या होत्या जेवण करून त्या नागाव गावाकडे परत येत असताना अंबप कासारवाडी दरम्यानच्या रस्त्यावर त्या अचानक गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला होता. त्यामुळे त्या कोमात गेल्या होत्या. त्यांच्यावर कोल्हापूरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्या गांधीनगर येथील एका कापड दुकानात गेली काहीं वर्षे काम करत होत्या. अपार कष्टाळू असणाऱ्या या महिलेच्या मृत्यूने नागाव गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा ,मुलगी असा परिवार आहे.