सेंट झेवियर्समध्ये विज्ञान प्रदर्शन:यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून बक्षिस प्रदान ‎

2 hours ago 1
मनमाड येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन झाले. उद्घाटनसेंट झेवियर्स हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या हस्ते झाले. उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक अनिल निकाळे, कमलेश पाटील उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनात एकूण ७० उपकरणे ठेवण्यात आलेली होती. कमलेश पाटील आणि महेश भोसले यांनी परिक्षण केले. प्रदर्शनातील यशस्वी झालेल्या पुढील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना अंजलिना झेवियर यांच्यातर्फे चषक व भेटवस्तू देण्यात आल्या. सूत्रसंचालन प्रकाश नान्नोर यांनी केले. अजिंक्य जाधव, अरविंद दळवी यांनी सहकार्य केले. लहान गट : साहील एकनाथ सदगीर (प्रथम), अनुज दत्तू जाधव (द्वितीय), स्वरूप हनुमान सोनवणे (तृतीय), समर्थ दुर्गेश डिंबर (उत्तेजनार्थ) मध्यम गट : आराध्य नीलेश धात्रक (प्रथम), मयुरी त्रिलोक जाधव, ऋतुजा नानासाहेब जाधव (द्वितीय), समृद्धी राजू जगताप, समिक्षा सिद्धार्थ जगताप (तृतीय), साई चंद्रकांतचुंबळकर (उत्तेजनार्थ) मोठा गट : हर्षल चंद्रकांत सांगळे, आरती वसंत आहिरे, जान्हवी मोहन सांगळे (प्रथम), श्रेया ललित घोडके, आम्रपाली राजेंद्र पगारे (द्वितीय), मयूर अनिल मुंढे, सुशांत चंद्रकांत धात्रक (तृतीय), निखिल सागर वैद्य, समर्थ संजय जाधव (उत्तेजनार्थ) यांचा गौरव करण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article