सेलसुरा फाट्याजवळ वंचितच्या उमेदवाराच्या वाहनावर पाच जणांची दगडफेक:उमेदवार जखमी, उपचारासाठी नांदेडला हलविले

3 days ago 2
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा पाटीजवळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या वाहनावर पाच जणांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी ता. १८ मध्यरात्री दिड वाजता घडली आहे. असून यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के हे सोमवारी ता. १८ मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा पाटीजवळ आले असतांना त्या ठिकाणी एका स्वीफ्ट डिझायर वाहनातून आलेल्या पाच व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ते घाबरून गेले. हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीमध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच वाहनाच्या काचाही फुटल्या आहेत. तसेच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक इंगळे जमादार कैलास सातव, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच कार्यकर्तेही एकत्र आले. या घटनेत जखमी झालेल्या डॉ. मस्के यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तातडीने नांदेडला जाऊन त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा जवाब नोंदविला आहे. स्वीफ्ट कारमध्ून आलेल्या पाच जणांनी हा हल्ला केल्याचे जवाबात नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी अनोळखी पाच व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक भोसले यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article