सेवा रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी जागर:मनपा आयुक्‍त, प्रशासक सचिन कलंत्रेंसह अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांचा सहभाग

1 hour ago 1
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत महात्‍मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्‍त्री यांच्‍या जयंती निमित्त २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी २ ऑक्टोबरला नेहरू मैदान येथे स्‍वच्‍छता ही सेवा रॅली काढून स्वच्छतेचा जागर केला. रॅलीत मनपातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. महात्‍मा गांधी यांच्‍या जयंती निमित्‍ताने स्‍वच्‍छतेचा संदेश या रॅली मार्फत नागरिकांना दिला . स्वच्छोत्सव यशस्वी करण्यासाठी स्वच्छता ही सेवा रॅलीत सहभागी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे कौतुक करून रॅली’ प्रसंगी आयुक्त, प्रशासक सचिन कलंत्रे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कचरामुक्त शहरांचे अभियान राबवताना ‘स्वच्छता ही सेवा’ आयोजित करून नागरिकांचे स्वच्छता कार्यातील महत्व अधोरेखित केल्याचे आयुक्तांनी सांगितले. मनपा आयुक्तांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये स्वच्छता संदेशांचे फलक झळकवत स्वच्छ, सुंदर, प्लास्टिक मुक्त शहराचा दमदार प्रचार केला . रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून रॅलीला सलामी दिली. अनेकजण रॅलीत सहभागी झाले. जयस्‍तंभ चौक येथे रॅलीची सांगता होत असतांना ‘ओला, सुका व घातक’ कचरा वर्गीकरणाविषयी हसतखेळत संदेश देणाऱ्या आरंभ व प्रस्तुत पथनाट्याचे सादरीकरण केले. ‘स्वच्छोत्सव २०२४’ च्या अनुषंगाने नागरिकांचे स्वच्छतेमधील अनमोल योगदान लक्षात घेत त्यांच्या स्वच्छता कार्याचा यथोचित सन्मान करीत मनपाने आयोजित केलेली ही ‘स्वच्छता ही सेवा रॅली’ स्वच्छतेचा जागर करीत यशस्वी केली. नेहरू मैदानातून विद्यार्थ्यांसह मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांची बुधवारी सकाळी स्वच्छता रॅली निघाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article