सैफ अली खान प्रकरण:आरोपी बांगलादेशातील असेत तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे अपयश, आदित्य ठाकरे यांची मोदी सरकारवर टीका

3 hours ago 3
बांगलादेशहून येऊन आरोपी गुन्हा करतो हे केंद्र सरकारचे अपयश आहे. गेली 10 वर्षे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, त्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली पाहिजे असे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा जर रोहिंग्या असेल तर ही गंभीर बाब आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंद्राची नेमकी जबाबदारी काय? आदित्य ठाकरे म्हणाले की, जर बांगलादेशहून आलेला व्यक्ती इथे गुन्हा करत असेल तर हे केंद्र सरकारचे अपयश आहे. गेल्या 10 वर्षांपासून केंद्रात भाजपचं सरकार आहे, आता तिसरी टर्म आहे. अशा प्रकारे दुसऱ्या देशातले लोक घुसखोरी करत असतील तर केंद्र सरकारची नेमकी जबाबदारी काय? ही बाब फार गंभीर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोलायला हवे. आरोपीला ठाण्यातून अटक, बांगलादेशी असल्याचा संशय सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विजय दास असे आरोपीचे नाव आहे. काल मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची खार पोलिस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, आरोपी चोरीच्या उद्देशाने अभिनेत्याच्या घरात घुसला होता. त्याच्याकडे भारतातील कोणताही वैध कागदपत्र नाहीत. तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे. हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये करतो काम पोलिसांनी असेही सांगितले की त्याचे खरे नाव मोहम्मद शहजाद आहे, जो 30 वर्षांचा आहे. तो पहिल्यांदाच सैफच्या अपार्टमेंटमध्ये शिरला. त्याने आपले नाव बदलून विजय दास असे ठेवले. तो 5-6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. इथे तो एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करतो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article