सैफच्या घरी आरोपीच्या बोटांचे 19 ठसे सापडले:आरोपी बसस्थानकावर झोपला

2 hours ago 1
१६ जानेवारीच्या रात्री अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना ठोस पुरावे मिळाले आहेत. सैफच्या घरात आरोपी बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहंमद रोहिल्ला अमीन फकीर ऊर्फ ​​विजयदास याच्या बोटांचे १९ ठसे सापडले. सूत्रांच्या माहितीनुसार, गुन्ह्याचे ठिकाण, बाथरूमची खिडकी, डक्ट शाफ्ट व पायऱ्यांवरून बोटांचे ठसे घेतले. आरोपी सातव्या-आठव्या मजल्यावर पायऱ्या चढून गेला. त्यानंतर पाइपच्या साहाय्याने बाराव्या मजल्यावर पोहोचला. तेथून त्याने बाथरूमच्या खिडकीतून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. नंतर तेेथूनच पसार झाला. घटनेनंतर तो बस स्टॉपवर झोपला. नंतर कपडे बदलून वांद्रे रेल्वे स्टेशनला गेला. तेथून दादरला व मग वरळीला गेला. वांद्रे रेल्वे स्टेशन, दादर आणि वरळीतील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी त्याचा माग काढला. वाटेत एका दुकानात त्याने पराटा खाऊन पाण्याची बाटली घेतली. ऑनलाइन पेमेंट केले. पोलिसांनी हाच नंबर ट्रेस करून ठाणे गाठले. तेथील हिरानंदानी इस्टेट येथून आरोपीला अटक केली. मीडियात आपला फोटो पाहून घाबरला आरोपी पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी टीव्ही आपला फोटो पाहून घाबरला व बांगलादेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. तो बांगलादेशातील झालोकाठीचा रहिवासी आहे. मागील ५ वर्षांपासून मुंबईत तो रोजंदारीची कामे करत होता. पाठीवरील बॅगमुळे हल्लेखोर सापडला पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले की, तो केवळ त्याच्या जिल्ह्यातच नाही तर राष्ट्रीय स्तरावरही कुस्ती खेळला आहे. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपीने अनेक युक्त्या वापरल्या, पण पाठीवरील बॅगमुळे तो पकडला गेला. वांद्रे रेल्वेस्थानकावर १७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाठीवरील बॅगची बारकाईने तपासणी केली असता तार जुळाले. आरोपीने यापूर्वी वरळी येथील एका पबमध्ये काम केले होते. १७ जानेवारी रोजी अंधेरी येथे त्याचे सीसीटीव्ही फुटेज आढळले. यात तो ठेकेदार जितेंद्र पांडेसोबत दुचाकीवरून जात होता. ठेकेदाराने त्याला दुचाकीवरून सोडल्यानंतर आरोपी ठाण्याकडे रवाना झाला. या ठेकेदाराने आरोपीचा मोबाइल क्रमांक पोलिसांना दिला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article