सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांची गय नाही:प्रत्येक गुन्ह्याची होणार कसून चौकशी, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा इशारा
2 days ago
2
हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, सोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलची पाच पथके स्थापन करण्यात आली असून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हयात हिंगोलीसह कळमनुरी व वसमत विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हयात सुमारे २००० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात केले असून या सोबतच राज्य राखीव दलाच्या व सीमा सुरक्षा दलाच्या चार कंपन्यांचे जवान तैनात केले आहे. संवेदनशील भागात स्थानिक पोलिसांसोबतच इतर १८ पथकांच्या माध्यमातून गस्त घातली जात आहे. जिल्हयात सोशल मिडीयाच्या माध्यमातून विनाकारण अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलचे पाच पथके कार्यरत ठेवण्यात आली असून पुढील दोन दिवस हि पथके चोविस तास कार्यरत राहणार आहेत. सोशल मिडीयावर चुकीची पोस्ट टाकणे, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणे तसेच अफवा पसरविण्याऱ्या पोस्ट टाकल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे. व्हॉटस्अप ग्रूपवरही पोलिसांचे लक्ष असून ग्रूप ॲडमीन यांनी त्यांच्या ग्रूपवर चुकीच्या पोस्ट व्हायरल होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सुचनाही पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी दिल्या आहेत. जिल्हयात निवडणुकच्या अनुषंगाने घडलेल्या गुन्हयांचा सखोल तपास केला जाणार असून परिस्थितीजन्य पुरावे तपासले जाणार आहेत. या शिवाय घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुजेट व इतर बाबींची बारकाईने चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हयात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरीकांनी एकत्र थांबू नये. मतदारांनीही मतदान केल्यानंतर इतरत्र न थांबता घरी जावे. जिल्हयात कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी पोलिस ्प्रशासन सज्ज असून नागरीकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी केले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)