स्वीकारात्मकता हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली:डॉ. नंदू मुलमुले; बाबूजी देशमुख वाचनालय व्याख्यानमाला‎

1 hour ago 1
आयुष्य हे एक पॅकेज आहे. चार आवडत्या गोष्टी त्यात राहणार, तर दोन नावडत्या. आपल्याला वास्तविकतेचा स्वीकार करावाच लागेल. कर्म करत राहा व जीवन प्रवासाचा आनंद घ्या. समाधानी आयुष्यासाठी फक्त सकारात्मकता नाहीतर स्वीकारात्मकता ही गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन मानसोपचारतज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांनी केले. बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने प्रमिलाताई ओक सभागृहात सुरू असलेल्या व्याख्यानमालेत मानसोपचारतज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांनी "सुखाचा शोध' विषयावर बुधवारी तिसरे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी महादेवराव भुईभार होते. डॉ. मुलमुले म्हणाले, गतिमान जीवनशैलीत मानसिक वेगाने वाढत आहे. शारीरिक, मानसिक धोके आपल्या जीवनात निर्माण होत आहेत. अशा धोक्यांतून मार्ग काढून सुखाचा शाश्वत शोध घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. चांगल्या गोष्टी स्वीकारणे ही सुद्धा एक कला असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनात वाटचाल करत असताना कमी महत्वाकांक्षा बाळगा, क्षमाशील व्हा, विवेकशील व्हा, जीवनाला विनोदाची झालर असू द्या, आयुष्यासोबत प्रेम असू द्या, चेहऱ्यावर हास्य सदा फुलवित जा, आयुष्य हे निसर्गासारखे असू द्या, निसर्ग नियमाचे पालन करा, ही यशस्वी जीवनाची फलश्रुती असल्याचे अनेक उदाहरणावरून वक्त्यांनी स्पष्ट केले. वक्ता परिचय ज्येष्ठ कविवर्य नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी दिला. आभार सचिव अनुराग मिश्र यांनी मानले. जागतिक आरोग्य संघटनेने हॅपीनेस इंडेक्स जाहीर केला. या इंडेक्समध्ये अन्न, वस्त्र, निवारा, हाताला काम, आयुष्याला अर्थपूर्णता तथा मधूर नातेसंबंध ही सूत्रे दिली आहेत. यातील मधूर नातेसंबंध ही मनाला संपूर्णपणे आनंद व स्थिर करणारी बाब आहे. मनुष्याजवळ कितीही वैभव, संपत्ती, पैसा आला, मात्र बाह्य व कौटुंबिक नातेसंबंध जर सुरळीत नसले तर नैराश्य उत्पन्न होते. म्हणून मधूर नातेसंबंध हीच यशस्वी जीवनाची फलश्रुती असल्याचेही डॉ. मुलमुले यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article