स्वेरीतर्फे राबवलेले उपक्रम विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहेत:बिजलानी व गाडगीळ यांची सदिच्छा भेट‎

1 hour ago 1
पंढरपूर ‘स्वेरीचा कॅम्पस, शैक्षणिक उपक्रम व कल्चर पाहता ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधनाचे जाळे विणलेले पाहून विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञानातील योगदान हे करिअर करताना महत्वाचे ठरणार आहे यात शंका नाही.’ असे गौरवोदगार आर. एस. व्ही. पी. (गव्हर्मेंट ऑफ इंडिया) चे योगेश बिजलानी यांनी काढले. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी कॅम्पसला गव्हर्न्मेंट ऑफ इंडियाच्या प्रिन्सिपल सायंटीफिक अॅडव्हायजर ऑफीसच्या आर. एस. व्ही. पी. (रुटॅग स्मार्ट व्हिलेज प्रोग्राम) चे योगेश बिजलानी, डिसॉल्ट सिस्टम फाउंडेशनचे प्रोग्राम डायरेक्टर हेमंत गाडगीळ व इतर मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सल्लागार बिजलानी बोलत होते. संस्थेच्या वतीने यावेळी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. योगेश बिजलानी व हेमंत गाडगीळ यांनी संशोधन विभागाची प्रगती सविस्तरपणे जाणून घेतली. यावेळी पाहुण्यांनी संशोधन विभागाबरोबरच इतर विभागांना भेट देऊन माहिती जाणून घेतली. उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, डॉ. हर्षवर्धन रोंगे, डॉ. एम.एम. आवताडे आदी प्राध्यापकांकडून संशोधन प्रकल्प, रुरल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फॅसिलिटी (आरएचआरडीएफ), विविध शैक्षणिक, विधायक व सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article