हिंगोलीत अधिकारी-कर्मचाऱ्यांची श्रमदानातून साफसफाई मोहिम:जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून काढला 10 ट्रॅक्टर कचरा

3 hours ago 1
हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय व पालिका प्रशासनाने शुक्रवारी ता. 31 पहाटे श्रमदानातून साफसफाई मोहिमेत अवघ्या दोन तासात 10 ट्रॅक्टर कचरा काढण्यात आला. त्यामुळे परिसर चकाचक झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या मोहिमेत शासकिय कार्यालय व परिसरात स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सकाळी साडे सहा वाजल्यापासूनच स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी अनील माचेवाड, पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, नागेश बोलके यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरात झाडझूडही केली. तसेच नाल्यांमध्ये व मोकळ्या जागेत टाकण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पेपर डिश, खराब कागद, फुटलेल्या काचा उचलून घेण्यात आल्या. या शिवाय मातीचे ढिग काढण्यासाठी तीन जेसीबी लावण्यात आले होते. अवघ्या दोन तासात या ठिकाणी 10 ट्रॅक्टर कचरा काढण्यात आला. पालिकेच्या 4 ट्रॅ्क्टर व तीन घंटागाड्यांच्या मदतीने या कचऱ्याची वाहतूक करून हा कचरा डंम्पींग ग्राऊंडवर नेऊन टाकण्यात आल्या. या मोहिमेमुळे अवघ्या दोन तासात जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर चकाचक झाला. या शिवाय कार्यालयाच्या परिसरात असलेल्या अटल घनवन या ठिकाणीही स्वच्छता करण्यात आली आहे. कार्यालयांतर्गत साफसफाई केली जाणार- अभिनव गोयल, जिल्हाधिकारी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात साफसफाई केल्यानंतर आता कार्यालयातून साफसफाई केली जाणार आहे. यामध्ये कार्यालयातील दस्ताऐवज व्यवस्थीत लावणे, छताचे जाळे जळमटे काढली जाणार असून कार्यालय देखील चकाचक केले जाईल. हि मोहिम दर महिन्यात राबविली जाणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article