हिंदुस्थान, अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टर चिप प्रकल्पासाठी लष्करी सहकार्य, क्वाड परिषदेनंतर उभय देशांनी केली घोषणा

2 hours ago 2

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात लष्करी तंत्रज्ञान सहकार्याने सेमीकंडक्टर चिप संयुक्त प्रकल्पाची उभारणी होणार असल्याचे टिपण क्वाड परिषदेनंतर रविवारी उभय देशांनी जारी केले.

राष्ट्रीय सुरक्षा, दूरसंचार तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा अनुप्रयोगांसाठी प्रगत सेन्सिंग, दळणवळण आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा नवीन सेमीपंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटची स्थापना करण्याची घोषणा उभय नेत्यांच्या चर्चेनंतर करण्यात आली. अमेरिकेच्या लष्कराने भारतासोबत या चीप निर्मितीसाठी तंत्रज्ञान भागीदारी करण्यास सहमती दर्शवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तत्पूर्वी, वाढते जागतिक तणाव आणि संघर्षाच्या कालखंडात क्वाड युती जागतिकदृष्टया महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विल्मिंग्टन येथे शनिवारी अधोरेखित केले. त्यानंतर रविवारी न्यू यॉर्क येथे आलेल्या मोदी यांनी नासाऊ कोलोझियम येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.

बायडेन विसरले मोदींना

क्वाड लीडर्स परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भाषण संपवत असताना मोदी यांचे नावच विसरले. आपल्यानंतर कोण बोलणार हे बायडेन यांनी सांगणे अपेक्षित होते. मात्र, मोदींचे नाव विसरल्यामुळे, आता पुढे कोण, कोण आहे पुढचा वक्ता, असेच ते विचारत राहिले. अखेर त्यांच्या एका सहायकाने मोदींकडे हाताचा इशारा केल्यावर मोदी उठून पुढे आले आणि एक विचित्र प्रसंग थोडक्यात संपुष्टात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article