जालना रोडवर थरार:वाहनांना धडक देऊन कारचालक मित्रासह पसार; सेव्हन हिल्सला मद्यधुंद कारचालकाने६ वाहनांना उडवले; महिला गंभीर जखमी

2 hours ago 2
गजबजलेल्या जालना रोडवरील सेव्हन हिल्स ते आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मद्यधुंद सुसाट कारचालकाने तब्बल सहा वाहनांना जोरदार धडक दिली. यात एक दुचाकी, एक ऑटोरिक्षा आणि दोन कारसह इतर वाहनांचाही समावेश आहे. अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी (२२ सप्टेंबर) रात्री ८.१० वाजता झाला. धडक देणाऱ्या कारमधील दोघे पसार आहेत. विशेष म्हणजे कारमध्ये दोन दारूच्या बाटल्या अन् नशेसाठी वापरले जाणारे व्हाइटनर आढळले. जालना रोडवर ६ वाहनांना उडवणारी फोर्ड कंपनीची ‌‌फिएस्टा ही जुनी कार आहे. माॅडिफाय केलेल्या या कारचा क्रमांक एमएच ०२-बीएम ६२९६ आहे. रात्री आठला सेव्हन हिल्स उड्डाणपुलावरून आकाशवाणीकडे कार भरधाव जात असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सर्वात आधी या कारचालकाने जि.प. शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यपिका छाया पळसकर (६२, रा. गुलमोहर कॉलनी) यांच्या स्कूटरला (एमएच २० डीएल ५२०५) उडवले. त्यात छाया पळसकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तेथे उभ्या असलेल्या नीलेश पाटील या रिक्षाचालकाने कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण, कारने नीलेश यांच्या रिक्षालाही (एमएच २० ईके ३५९५) धडक मारली. त्यांच्या रिक्षाचे नुकसान झाले.त्यानंतर त्याने रस्त्यावरील २ कारसह अन्य २ वाहनांना ठोकरले. त्यांच्या वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. त्यामुळे हे वाहनधारक निघून गेले. धडक देणाऱ्या कारचा २ वर्षांपासून इन्शुरन्स नाही आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला, पण धडक दिली मी रस्त्यालगत होतो. आधी त्याने एका महिलेला धडक दिल्याचे मी पाहिले. मग त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने माझ्या रिक्षालाही धडक दिली. किमान ७० ते ८० ची त्याची स्पीड असेल. - नीलेश पाटील, ऑटोरिक्षाचालक टायर फुटले; गाडी सोडून पळाले सिंधी कॉलनीजवळील मित्रनगरच्या गार्डनपर्यंत फोर्ड कारने ६ वाहनांना उडवले. नंतर तेथेच कारचे टायर फुटले. टायर फुटल्याचा जोराचा आवाज आल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली. पण तोपर्यंत कारमधील दोघांनीही कार सोडून पळ काढला होता. त्यानंतर जवाहरनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. निरीक्षक सूरज बंडगर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा केला. या वेळी कारमध्ये दोन दारूच्या बाटल्या अाणि व्हाइटनर अाढळून अाले. पोलिस कारचालकाचा शोध घेत अाहेत. दारूच्या नशेत वाहन चालवण्याचा गुन्हा या प्रकरणी रात्री ११ वाजता भारतीय न्याय संहितेचे कलम २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे), १२५ ( इतरांची सुरक्षितता धोक्यात अाणणे), १८५ (दारूच्या नशेत वाहन चालवणे) अाणि १३४ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे. कारमध्ये आढळल्या मद्याच्या दोन, तर व्हाइटनरची एक बाटली

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article