केंब्रिज चौकात जरांगेंच्या समर्थनार्थ ‘रास्ता रोको’:सव्वा तास वाहतूक थांबली; २ किमीपर्यंत रांगा

2 hours ago 2
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा समाजातर्फे रविवारी (२२ सप्टेंबर) जालना रोडवरील केंब्रिज चौकात (जिजाऊ चौक) सव्वा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. आंदोलन मागे घेण्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. कारवाई करून त्यांना अर्ध्या तासानंतर सोडून देण्यात आले. या वेळी सुरेश वाकडे, सुनील कोटकर, सतीश वेताळ यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आरक्षण दिले नाही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला वारंवार मुदत देऊनही आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा उपोषणाला बसावे लागले आहे. जरांगे यांची तब्येत खालावत असून सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. सरकारला इशारा म्हणून केंब्रिज चौक बंद ठेवला. आंदोलकांना ताब्यात घेऊन सरकार दडपशाही करत आहे. - सुरेश वाकडे, आंदोलक. कायदेशीर कारवाई केली ‘रास्ता रोको’ला परवानगी दिली नव्हती. अचानक आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. लोकांचे हाल होत असल्याने आंदोलकांना ताब्यात घेतले होते. ‘रास्ता रोको’ केल्याने आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली. - सुदर्शन पाटील, सहायक पोलिस आयुक्त.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article