हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा:अधिवक्ता व विविध हिंदुत्ववादी संघटनांची मागणी; पोलिसांना सादर केले निवेदन

2 hours ago 1
संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी अधिवक्ता व हिंदुत्ववादी संघटनांतर्फे मंगळवारी करण्यात आली. यासाठी पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन, सनातन संस्कृती महासंघ, श्री स्वामी समर्थ केंद्र, हिंदू जनजागृती समितीचे रणरागिणी शाखा, सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. संघटनांनी केलेल्या दाव्यानुसार नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यात ज्ञानेश महाराव हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत व श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल वादग्रस्त आक्षेपार्ह व अपमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे हिंदू धर्माच्या धार्मिक सिद्धांतांचा दुष्ट हेतूने जाणीवपूर्वक अपमान करून माझ्या तसेच समस्त हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या. यासाठी ज्ञानेश महाराव व आयोजक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येऊन अटक करण्यात यावी, अशी तक्रार अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राष्ट्रीय संघटक उदय महा यांनी खदान पोलिस ठाण्यात दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९, ३०२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रसंगी शिवसेनेच्या शिंदे गटाचे महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, राजू मंजुळेकर, रवींद्र फाटे, हेमंत जकाते, मनोज अग्रवाल, अरुणराव दुधाळकर आदी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article