ही निवडणूक प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करावी:उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांचे आवाहन; अधिकाऱ्यांना सूचना

2 hours ago 1
पत्रकार व प्रशासन अशा दोघांनी समन्वय साधून विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडूयात, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी केले. १६ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी देवरे यांनी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर करताच कारंजा - मानोरा विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना विविध सूचना केल्याचे नमूद केले. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर मतदार, राजकीय पक्ष यांच्या सुविधेसाठी नवीन इमारतीत वेगवेगळे कक्ष तैनात केले जातील. तसेच स्थानिक शेतकरी निवास येथे प्रशिक्षण व मतमोजणी होईल. निवडणूक संबंधी पत्रकारांना अद्यावत माहिती दिली जाणार आहे. लोकसभेच्या तुलनेत मतदारसंघात आठ मतदान केंद्र वाढवण्यात आले असून, ज्या केंद्रात १२०० पेक्षा अधिक मतदार होते, येथील काही मतदार कमी आलेल्या केंद्राच्या यादीत समाविष्ट केले आहे. निवडणूक काळात कुठलेही फलक लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे गरजेचे आहे. मतदारांच्या सुविधेसाठी लवकरच मदत केंद्र व त्यासंबंधी मोबाईल क्रमांक सुरू करण्यात येईल. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून त्यासाठी माध्यमांनी जनजागृती करावी, असे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले. यानंतर उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये त्यांनी कारंजा - मानोरा विधानसभा मतदारसंघात एकही संवेदनशील केंद्र नसल्याचे सांगितले. तसेच मतदान करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी कारंजाचे तहसीलदार कुणाल झाल्टे, मानोराचे तहसीलदार सुनील यावलीकर, नायब तहसीलदार अनिल वाडेकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. घरोघरी जाऊन वृद्धांचे मतदान करुन घेणार ८५ वर्षांपेक्षा अधिक वृद्ध व ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या मतदारांचे घरोघरी जावून मतदान घेतले जाणार आहे. तसेच, केंद्रावर जावून मतदान करणाऱ्या दिव्यांगासाठी मतदानाची विशेष सोय केली जाणार आहे. मतदानापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी मतदारांनीही जागरूक राहणे आवश्यक असल्याचे कैलास देवरे यांनी नमूद केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article