हुंडीवाले हत्याकांड; पीआय ठाकरे यांची साक्ष नोंदवली:विशेष सरकारी वकील, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद

2 hours ago 1
गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणातील सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने या गुन्ह्यातील तपास अधिकारी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक विनोद ठाकरे यांची साक्ष सोमवारी व मंगळवारी नोंदवली. अपूर्ण राहिलेली साक्ष १५ ऑक्टोबर रोजी नोंदवण्यात येणार आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. धर्मदाय आयुक्त कार्यालयात ६ मे २०१९ रोजी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विक्रम उर्फ छोटू श्रीराम गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, रणजीत गावंडे, प्रवीण गावंडे, धीरज गावंडे, सूरज गावंडे, मंगेश गावंडे, सतीश तायडे, विशाल तायडे, मयूर अहीर, दिनेश राजपूत, प्रतीक तोंडे, मो. साबीर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात साक्षीदारांच्या साक्ष सुरू आहेत. मंगळवारी या खटल्याच्या सुनावणी दरम्यान अॅड. उज्ज्वल निकम यांनी पोलिस निरीक्षक विनोद ठाकरे यांची साक्ष नोंदवली. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी विनोद ठाकरे यांची साक्ष नोंदवली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article