कैलास पाटील यांनी 50 खोक्यांना लाथ मारालीच, मंत्रीपदही लाथाडले; ओमराजे निंबाळकर यांचे वक्तव्य

5 hours ago 2

आमदार कैलास पाटील यांनी फक्त पन्नास खोक्याना लाथ मारली नाहीतर मंत्रीपदावर सुद्धा पाणी सोडल, याचा मी स्वतः साक्षीदार असल्याचा गौप्यस्फोट खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनीच ही ऑफर माझ्याच फोनवरून केल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. इटकूर (ता. कळंब ) येथे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारसभेत ओमराजे बोलत होते.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, ही असले बाजारबुणगे असते तर गुवाहटीला जाऊन गद्दारी केली असती. पण कैलास पाटील हा बहाद्दर आमदार होता म्हणून निष्ठावंत राहिला. पन्नास खोक्यावर तर लाथ मारलीच पण मंत्रीपदाच्या आमिषाला सुद्धा त्यांनी धुडकावून लावले. या सर्व घडामोडीचा मी स्वतः साक्षीदार आहे. माझ्याच फोनवर देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला तेव्हा त्यांनी ओमराजे तुमची अडचण आहे. पण कैलास पाटील यांना काय अडचण आहे, असा सवाल केला. तेव्हा मी म्हणलं ते माझ्याबरोबरच आहेत त्यांना फोन देतो तुम्हीच बोला. फडणवीस यांनी कैलास पाटील यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद देतो म्हणाले, आमदार पाटील यांनी स्पष्ट शब्दात त्यास नकार दिला. त्यांनी मी आहे त्याठिकाणी व्यवस्थित आहे, असं सांगितलं. काही वेळानं पुन्हा फोन केला व फडणवीस यांनी मग कॅबीनेट मंत्री करतो म्हणाले. आमदार कैलास पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्री जरी केल तरी आपण तिकडे येणार नसल्याच ठामपणे सांगितलं. असा खुद्दार आमदार आपल्या मतदार संघाला मिळाला आहे. ज्यांनी स्वाभिमानी राहून आपल्या पक्षाशी इमान राखल व जनतेनं टाकलेल्या मताशी ते प्रामाणिक राहिले. त्यामुळं मला अशा आमदाराचा निश्चित अभिमान आहे. याला म्हणण्यात निष्ठा पण दोन वेळा जिल्हा परिषदेला सपाटून मार खाल्लेले बाजारबुणगे आम्हाला निष्ठा शिकवतात, असा सवाल खा ओमराजे यांनी केला. ईटकुर ता कळंब येथील सभेत बोलत होते.

व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर विठ्ठल माने, आदि उपस्थित होते.

या वेळी उमेदवार आ कैलास पाटील यांनी आपल भविष्य घडविणारी ही निवडणुक आहे. उद्योगपतीचे 15 लाख कोटीच कर्ज मोदी सरकारने माफ केले. पण शेतकरी कर्जमाफीला यांच्याकडे पैसे नाहीत, असे शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या या सरकारला हद्दपार करा. राज्यात भेसळयुक्त तीस टक्के दुध मिळतंय. या मुळे कॅन्सरचे रुग्ण वाडले आहेत. भेसळ रोकली की दुधाला भाव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article