1995 नंतर मोहोळ, माढ्यात प्रथमच परिवर्तन:बबनराव शिंदे, राजन पाटलांच्या वर्चस्वाला धक्का, मोदी लाटेतही राखला होता गड‎

1 hour ago 1
संपूर्ण राज्यभरात लाडक्या बहीण योजनेमुळे महायुती सरकारमधील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची लाट असताना महाविकास आघाडीने सोलापूर जिल्ह्याचा गड राखण्यात यश मिळवले. माढा व मोहोळ मतदारसंघात १९९५ च्या निवडणुकीनंतर प्रथमच परिवर्तन पाहायला मिळाले. माढ्यात बबनराव शिंदे तर मोहोळमध्ये राजन पाटील यांच्या ३० वर्षांच्या वर्चस्वाला धक्का देत प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या नव्या चेहऱ्यांनी परिवर्तन घडवून आणले. बबनराव शिंदे व राजन पाटील यांनी १९९५ पासून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. मूळचे कांग्रेसचे असलेले शिंदे व पाटील हे १९९९ मध्ये राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर ते कायम शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. गेल्या ३० वर्षात दोघांनाही आपल्या बालेकिल्ला मजबूत केला. २०१४ व २०१९ मध्ये देशात आणि राज्यात आलेल्या मोदी लाटेतही मोहोळ व माढा मतदारसंघाचा गड हलला नाही. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मात्र दोघांनीही शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत राहिले. पण सत्तेत असून ही अपक्ष लढण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला तो त्यांच्या अंगलट आला. तर पाटील यांना लाडकी बहिणीची साथ असतानाही विजय मिळवून देण्यात अपयश आले. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी शरद पवार यांनी केलेली बांधणी दोघांचे वर्चस्व मोडीत निघण्यास निर्णायक ठरली. १९९५ मध्ये राजन पाटील यांनी प्रथम निवडणूक लढवत शेकापचे आमदार चंद्रकांत निंबाळकर यांचा पराभव करत काँग्रेसकडे ही जागा खेचून आणली. १९९९ मध्ये राष्ट्रवादीकडून दुसऱ्यांदा आमदार झाले. २००४ मध्ये त्यांनी आमदारकीची हॅट्रीक केली. २००९ मध्ये मोहोळ मतदारसंघ राखीव झाला. तेव्हा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना निवडून आणले. त्यानंतर २०१४ रमेश कदम आणि २०१९ मध्ये यशवंत माने यांना आमदार करण्यात राजन पाटील यांचा प्रमुख भूमिका राहीली. पण या वेळेस सत्तेत असताना लाडकी बहीण योजनेची साथ असताना त्यांना आपले वर्चस्व टिकवता आले नाही. राजन पाटील तीन वेळा आमदार , तीन टर्म विजयात निर्णायक

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article