24 तासांत 110 रेल्वेंची ये-जा, येथूनच 10 गावांतील लोक ओलांडतात:जीव धोक्यात घालून विद्यार्थी, शेतकरी, महिलांचा प्रवास सुरू‎

1 hour ago 1
अक्कलकोट स्टेशन रेल्वे गेट उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन पाच वर्षे उलटली तर काम संथगतीने सुरू आहे. वर्कऑडरमधील मुदतीनुसार फेब्रुवारी २०२५ पर्यंत काम संपवणे अपेक्षित असले तरी अजून ५० टक्के कामही पूर्ण केलेले नसल्याची लोकांची तक्रार आहे. परिसरातील गावातील शेतकरी, प्रवाशांना यामुळे मोठे हाल सहन करावे लागत आहेत. येथून २४ तासात सुमारे ११० रेल्वे गाड्यांची ये-जा असते. या काळात रेल्वे फाटक बंद केल्यानंतर लोकांना ताटकळत थांबावे लागते. अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागातील या रस्त्यावर मोठी वर्दळ आहे. प्रवासी, भाविक, स्थानिक शेतकरी वर्ग याच रस्त्यावरून ये-जा करतो. शेतकऱ्यांना या रेल्वे गेटमुळे मोठी अडचण निर्माण होते. दर पाच पाच मिनिटाला वाहतूक बंद करण्यासाठी रेल्वेकडून फाटक बंद केले जाते. एकदा गेट बंद झाले की, अर्धा-अर्धा तास गेट बंदच राहते. दरम्यान रुग्ण, माल घेऊन ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसतो. माजी खासदार जयसिध्देश्वर स्वामी यांच्या कार्यकाळात भूमिपूजन दौंड ते शहाबादवाडी दरम्यान दुहेरी करण व विद्युतीकरण झाल्याने पाच-पाच मिनिटात गाडी येते. परंतु हे गेट अर्धा-अर्धा तास बंद होते. गेल्या पाच वर्षांपासून काम चालू आहे. माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्यांचा खासदारकीचा काळ संपला तरी उड्डाणं पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. गावकऱ्यांची नेहमीची ये-जा रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार, आंदोलन केल्यानंतर दहा वर्षाने काम सुरू. पण संथ गतीने चालू आहे. या परिसरात नागणसूर, गौडगाव बु., नाविंदगी, जेऊरवाडी, शावळ, तोळनूर, हैद्रा आदी गावकऱ्यांची नियमित ये-जा असते. अक्कलकोट-सोलापूरसाठी याच मार्गावरून ये-जा करावी लागते. महिबूब मुल्ला , माजी जि. प. सदस्य. फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत, प्रयत्न करू अक्कलकोट रेल्वे उड्डाण पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर आहे. २२ कोटी २३ लाख रुपये खर्च मंजूर असून २३ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्कऑर्डर दिली आहे. २२ फेब्रुवारी २५ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. रेल्वे गेट वारंवार बंद होत असल्याने लोकांना त्रास होतो. काम लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करू. -डहाळे, शाखा अभियंता. बांधकाम.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article