काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेPudhari
Published on
:
22 Jan 2025, 1:57 pm
Updated on
:
22 Jan 2025, 1:57 pm
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात आले होते. एका विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आलो असता, शरद पवार यांची भेट घेतल्याचे नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केलं. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नानांनी फडणवीस सरकारवर टीका केली. फडणवीस यांनी केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्याबाबत बोलत असताना ते म्हणाले, विरोधी पक्षात असताना फडणवीस हे सत्ता आल्यास 24 तासात आरक्षण मिळवून देऊ असे बोलायचे. पण आता त्यांची सत्ता येऊन 3 महिने झाले असले तरी ओबीसी आरक्षणाबाबत त्यांनी कोणतीही हालचाल केलेली दिसून येत नाही . महायुती वर आलबेल असल्याचे दाखवत असली तरी तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेजारी एकत्र बसले तरी एकमेकांकडे पाहणेही टाळतात.
यावरूनच महायुतीमध्ये सगळं नीट नसल्याचे दिसून येत आहे असेही यावेळी ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना सतत या युतीच्या भविष्याबाबत साशंकता आहे. सध्या ते दावोसमध्ये असले तरी त्यांना तिथे स्थिरचित्तता नाही. त्यांना जनतेच्या हितापेक्षा, राज्य हितापेक्षा इथल्या फोडाफोडीच्या राज्यकारणातच यश आहे. त्यात एकीकडे यांच्याच पक्षाचे मंत्री बेताल वक्तव्य करतात. नंतर सारवासारव करतात. बेईमानी करून सत्तेत आलेल्या लोकांकडून आपण अजून काय अपेक्षा ठेवायची. हे सरकारच लुटपाट करणारे सरकार आहे.
शेतकरी आत्महत्येला सरकार जबाबदार
कृषिविमा किंवा कृषि यांत्रिकीकरण योजनेला 3 वर्ष निधी मिळाला नाही या प्रश्नावर उत्तर देताना पटोले म्हणाले, ‘या योजनेनेत बदल तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला. तो का केला याबाबतचे प्रश्न उच्च न्यायालयाने विचारले. मधल्या काळात या योजनेला अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी कृषी विभागाने आक्षेप घेतला त्यामुळे निधी थांबवला गेला. कृषी संदर्भात जी काही खरेदी केली होती त्या खरेदीत भ्रष्टाचार. गेडाम नावाच्या आयुक्तांनी विरोध केल्यानंतर त्यांची बदली केली गेली. शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम या सरकारने केल आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्याची अवस्था वाईट. झाली आहे. त्यांच्याकडून पीक विमा गोंधळ, धान खरेदीबाबत निर्णय नाही. तसेच शेतकरी हितासाठी कोणतेही ठोस निर्णय नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे सरकारच असल्याचे विधान त्यांनी यावेळी केले.