Published on
:
22 Jan 2025, 5:01 pm
Updated on
:
22 Jan 2025, 5:01 pm
शिरढोण : टाकवडे (ता. शिरोळ) येथील शाळकरी मुलीचा विनयभंग करत गैरकृत्य केल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी चौघांना ताब्यात घेवून अटक केली आहे. अजय भीमा कोळी (वय २७), बबलू बाबू कोळी (वय २८), अशोक शंकर कडकलक्ष्मी उर्फ कोळी, (वय २५) व सचिन बाळू दुर्गमुर्ग (वय २० सर्व रा. वाळकेनगर, हुपरी, ता. हातकणंगले) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येथील प्राथमिक शाळा सुटल्यानंतर दोन अल्पवयीन मुली नांदणी रस्त्याला असलेल्या मळा भागातील घटाकडे पायी जात होत्या. संशयित आरोपींनी आपल्या ओमणी व्हॅन मुलीजवळ थांबवून धरुन ओढण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्याने नागरिक धावून येताच आरोपींनी पळ काढला होता. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेज वरुन वाहनाचा शोध घेवून शिरोळ पोलिसांनी बुधवारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.
टाकवडे येथे मंगळवारी सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. व्हॅन नांदणी मार्गे टाकवडेत आली. दरम्यान घटनेनंतर संबधित आरोपी भरधाव वेगाने इचलकरंजी मार्गे निघून गेले. शिवाय ओढ्यानजीक गेल्यावर सदर गाडीची नंबर प्लेट काढून टाकल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले. दरम्यान शिरोळ पोलिसांनी चक्रे फिरवून बुधवारी पहाटे आरोपींना हुपरी येथून ताब्यात घेतले. दरम्यान टाकवडेत या घटनेनंतर विद्यार्थी पालक वर्गात भीतीचे वातावरण आहे.