टीम इंडियाचा युवा आणि विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात वादळी खेळी केली आहे. अभिषेक शर्मा याने ईडन गार्डनमध्ये 133 धावांचा पाठलाग करताना स्फोटक अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेकने फक्त 20 चेंडूत हे झंझावाती अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेक यासह 2025 या वर्षात टीम इंडियासाठी अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. अभिषेकच्या टी 20i कारकीर्दीतील हे पहिलं अर्धशतक ठरलं. तसेच अभिषेकच्या अर्धशतकामुळे टीम इंडिया विजयाच्या आणखी जवळ पोहचली आहे.
अभिषेक शर्माचं विस्फोटक अर्धशतक, पाहा व्हीडिओ
🔥 #AbhishekSharma joins the ̶p̶a̶r̶t̶y̶ SIX FEST! 👏
📺 Watch it FREE connected Disney+ Hotstar: https://t.co/CBKmsIywOl #INDvENGOnJioStar 👉 1st T20I LIVE NOW connected Disney+ Hotstar & Star Sports! | #KhelAasmani pic.twitter.com/wQDE7269CM
— Star Sports (@StarSportsIndia) January 22, 2025
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.