421 दिव्यांगांसह 85 वर्षीय ज्येष्ठांचे मतदान:अचलपूर मतदारसंघात 14 पथकांकडून प्रक्रिया

2 hours ago 1
अचलपूर मतदारसंघात ४२१ मतदारांनी गृह मतदान केले. यात दिव्यांग आणि ८५ वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केले. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी १४ पथके नियुक्त केली होती. निवडणूक आयोगाने दिव्यांग आणि ८५ वर्षे पूर्ण असलेले मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून ही सुविधा केली. अचलपूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची जबाबदारी अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे कौतुक होते आहे. चांदूर बाजार आणि अचलपूर तालुका मिळून एकूण दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले तसेच मतदानासाठी अर्ज केलेल्या एकूण ४२१ मतदारांनी गृह मतदान केले. ही प्रक्रिया १५ नोव्हेंबरला राबवल्याची माहिती निवडणूक विभाग नायब तहसीलदार अक्षय मांडवे यांनी दिली. एसडीओ बळवंत आरखराव यांच्या नेतृत्वात गृह मतदानासाठी पथके तयार केली होती. गृह मतदान करताना ज्येष्ठ मतदार.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article