कन्नड शहरातील नवीन नागरी वसाहती सुविधांपासून वंचितच:चंद्रलोकनगरी वसाहतीत रस्ते नाही, गटार नाही, लोकांचे हाल
2 hours ago
1
कन्नड शहर शहराचा विस्तार झाला. नागरी वसाहती वाढल्या. नवीन वसाहती नगरपालिकेत सामावून घेण्यात आल्या. मात्र या वसाहती सुविधांपासून वंचितच आहेत. चंद्रलोकनगरीचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. चारशे ते पाचशे घरांच्या वसाहतीतील दीड ते दोन हजार नागरिकांना रोजच रस्त्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शिवाजी महाविद्यालय, केंद्र शासनाचे पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय लगत ही चंद्रलोकनगरी नवीन वसाहत वसली आहे. मात्र चंद्रलोक नगरी येथील नागरिकांना रस्त्यांची सुविधा नाही. चाळीसगाव रोडपासून, शिवाजी महाविद्यालयाकडून असे दोन मार्ग आहेत. मात्र अत्यंत दयनीय अवस्था असल्याने बाजारात, शाळेत, महाविद्यालयात अथवा कुठल्याही कामासाठी जा-ये करणे अत्यंत जिकिरीचे होऊन बसले आहे. चारचाकीचा तर विषयच नाही. दुचाकी चालवणे देखील अवघड आहे, अशी परिस्थिती आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर ही परिस्थिती अत्यंत बिकट होऊन बसते. वाहने चिखलात फसतात, पायी चालणेदेखील शक्य नाही. स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा नगरपालिकेला नगरपालिका प्रशासनास याबाबतीत निवेदन दिलेले आहे. मात्र याकडे अद्यापपर्यंत लक्ष दिले गेले नसल्याचे येथील स्थानिक रहिवासी सांगतात. निवडणुका पश्चात्त प्रशासक यांनी या बाबीकडे लक्ष देऊन रस्त्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. येथे बऱ्याच ठिकाणी घरासमोर घरालगत घराच्या बाजूला जागा असेल तिथे अतिक्रमणे देखील वाढलेली आहेत, तेदेखील हटवावे, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याचा प्रश्न सोडवावा जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही. रुग्ण असेल तर खूप हालअपेष्टा होतात. नातेवाईक, पाहुणे आले तर रस्त्यामुळे जेव्हा ते बोलतात तेव्हा खूप वाईट वाटते. प्रशासनाने लवकर रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अशी प्रतिक्रिया रहिवासी शुभम जाधव यांनी दिली आहे. वसाहतीत मूलभूत सुविधांनचा अभाव आहे. जागोजागी पाणी साचले आहे. छाया : किशोर क्षीरसागर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)