गडचिरोलीत निवडणूक प्रक्रियेसाठी लष्कराची 5 हेलिकॉप्टर:30 ते 35 किमी पायपीट करून मतदान केंद्रावर पोहोचते पोलिंग पार्टी

2 hours ago 1
रविवार सकाळपासून भारतीय वायुसेनेच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरद्वारे अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या ७६ मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचाऱ्यांचे हेलीड्रॉपिंग अहेरी येथून सुरू झाले. इव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आणि सर्व मतदान कर्मचारी पोलिस ठाण्यांवरील १४ बेस कँप्सवर ड्रॉप केले जात आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. वायुसेना आणि लष्कराची पाच एमआय-१७ हेलिकॉप्टर सध्या निवडणुकीसाठी येथे आली आहे. बेस कॅम्पवरून उद्या सोमवार १९ रोजी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कर्मचारी अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर जाणे येणे अशी ३० ते ३५ किमी पायपीट करतात. १९ ची रात्र जंगलातच काढावी लागते. काही केंद्रांवर १० ते १५ किमी पायपीट करावी लागते. १९ तारखेपर्यंत गडचिरोलीमध्ये इव्हीएम आणि मतदान कर्मचाऱ्यांचे हेलीड्रॉपिंग चालू राहिल. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९७२ संवेदनशील मतदान केंद्रे आहे. यापैकी ४५८ मतदान केंद्रांवर बेस कॅम्पहून पायी जावे लागते. तर मतदान केंद्रांवर इव्हीएमची ने-आण चॉपरने होणार आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौ.कि.मी.आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागून आहेत. जिल्ह्याची एकूण साक्षरता ७४.४ टक्के गडचिरोली जिल्हा जवळपास ७६% जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थित लोक आश्रय घेतात. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १० लाख ७२ हजार ९४२ असून जनगणने नुसार पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या अनुक्रमे ५ लाख ४१ हजार ३२८ व ५ लाख ३१ हजार ६१४ याप्रमाणे आहे. जिल्ह्यात अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या अनुक्रमे १ लाख २० हजार ७४५ व ४ लाख १५ हजार ३०६ ऐवढी आहे. जिल्ह्याची एकूण साक्षरता ७४.४ टक्के आहे. जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्येची टक्केवारी ११.२५ % व ३८.७ % अनुक्रमे आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article