दिव्य मराठी विशेष:श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील व्यथा दूर होतात, सोमीनाथ महाराज खंबाट यांचे प्रतिपादन

2 hours ago 1
सच्चिदानंदस्वरूप भगवान श्रीकृष्णाची स्तुती भागवत कथेत होत असते. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील व्यथा दूर होतात म्हणून सर्वांनी भागवत कथा श्रवण करावी, असे महाराजांनी आपल्या कथेत दुसऱ्या दिवशी प्रतिपादन केले. सिल्लोड तालुक्यातील वरूड पिंप्री येथे श्री संत बलदेवदास महाराज यांच्या ८५ व्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात दुसऱ्या दिवशी श्रीमद भागवत कथेत सोमीनाथ महाराज खंबाट बोलत होते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज कुकलारे, गदाना यांचे पहिल्या दिवशीची कीर्तनसेवा झाली. या कीर्तनसेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नामाचा महिमा प्रतिपादन करणारा असा होता. महाराजांनी सांगितले की, संत-महात्मे सतत समाधानी होते. आनंदी होते. कारण संत सतत देवाचे नामस्मरण करायचे, कथा करायचे त्यामुळे त्यांचे जीवन सतत समाधानी होते. नामस्मरणाचा माध्यमातून त्यांना विदेह स्थितीचा आनंद मिळायचा. नामस्मरणामुळे संत-महात्मे अग्नीरूप झाले. या वेळी भाविकांनी कीर्तन श्रवण करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article