पिंपळदरी परिसरात कपाशी दुसऱ्या वेचणीतच संपली:भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात, रब्बीची तयारी

2 hours ago 1
कापसाला भावच नाही. त्यातच यंदा दुसऱ्या ते तिसऱ्या वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी, सिद्धेश्वर सनगरवाडा, सराटी, बोदवड, खंडाळा पानस, डिग्रस हळदा, वसई, जळकी, डकला, मुखपाठ, बाळापूर परिसरात शेतकऱ्यांनी उत्पन्नाची आशा जागवत कपाशीची लागवड केली होती. त्यामध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. कापसाला गेल्या वर्षीही कमी भाव होता. आताही त्यापेक्षा कमी भाव आहे. त्यातच यंदा दोन ते तीन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. या वर्षी मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मोठ्या आशेने कापूस लागवड केली होती. त्यात जमिनीत भरपूर ओल असल्याने उगवण शक्ती चांगली होती. मात्र, लागवडीनंतर जवळपास वीस ते पंचवीस दिवस पावसाने विसावा घेतल्याने पिके कोमेजून जात असताना पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र सतत काही काळ पाऊस टिकून राहिल्याने कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात तणवाढ झाली. परिणामी विविध रोगकिडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने पाते गळ झाली. कीड नियंत्रणासाठी महागडी तणनाशके व औषधीचे फवारणी करून कशीबशी कपाशी जगवली. दीर्घकाळ पाऊस लागून राहिल्याने भरपूर ओलाव्यामुळे मात्र पुढे कापसामध्ये सशक्त नसल्याने कपसाला हवा तसा लाग लागला नसल्याने कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात दोन ते तीन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article