Maharashtra Assembly Poll : वाहन तपासणीसाठी सहकार्य करावे : पोलिस अधीक्षक

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

17 Nov 2024, 6:31 am

Updated on

17 Nov 2024, 6:31 am

हिंगोली, पुढारी वृतसेवा : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी ७२ तास महत्त्वाचे असून या कालावधीत हॉटेल्स, ढाबा, लॉजेसची तपासणी केली जाणार असून या ठिकाणी बेकायदेशीर कामे खपवून घेतली जाणार नाही असा इशारा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.

येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब ऐवारे यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी निवडणुक प्रक्रियेच्या कालावधीत जिल्ल्यात १.६१ कोटी रुपये जप्त केले असून या शिवाय ८ तलवार, दोन खंजर, १ पिस्टल जम केले आहेत. गुटखा विक्रीच्या चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ७ लाखांचा गुटखा जप्त केला असून १३.६० लाख रुपये किमतीची ११ हजार ३७१ लिटर देशी दारू जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयात निवडणुकी पूर्वीचे ७२ तास व ४८ तास महत्त्वपूर्ण असून या कालावधीत मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे प्रकार नाकारता येत नाहीत. त्यासाठी वाढीव १५ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

या पथकांना गावांचेही वाटप करून देण्यात आले असून त्या त्या गावात जाऊन ते पाहणी करणार आहेत. मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे प्रकार आढळून आल्यास तातडीने कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हयात हटिल, लॉज, दाबे यांची तपासणी केली जाणार आहे. या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरकृत्य होत असल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे लॉजचालकांनी त्यांच्याकडे येणाऱ्यांची खात्री करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील तपासणी नाक्यांवर वाहन तपासणी कडक केली जाणार असून एकही वाहन तपासणीशिवाय सोडले जाणार नाही. नागरीकांनी प्रवास करतांना त्यांच्याजवळ ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम असणार नाही याची दक्षता घ्यावी. वाढीव रक्कम वागवणे किंवा वाहतूक करावयाची असेल तर त्याची रीतसर परवानगी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. वाहन तपासणीसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article