महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा उद्या 18 नोव्हेंबर रोजी थंडावतील. निवडणूक प्रचारातील अंतिम टप्प्यात आज शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतिदिनी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना समोर आला आहे. मुंबईत शिंदे गट आणि उद्धव गटात पोस्टर वॉर रंगलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला डिवचले आहे. ठाकरे गटावर जोरदार प्रहार चढवला आहे. या पोस्टरची मुंबईतच नाही तर राज्यभर सोशल मीडियावर पण चर्चा रंगली आहे.
शिवसेना विरुद्ध शिवसेना
बाळासाहेब ठाकरे यांचे एक वक्तव्य शिंदे गटाने प्रसिद्ध केले आहे. विविध वृत्तपत्रात त्याची जाहिरात आणि होर्डिंग लावण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या छायाचित्रासह यामध्ये वाक्य देण्यात आले आहे. ‘मी, माझी शिवसेना कधीच काँग्रेस होऊ देणार नाही.’ असे बाळासाहेबांचे वाक्य प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा
तर उद्धव ठाकरे यांनी पण जाहिरात दिली आहे. भीती, भूक, भ्रष्टाचाराचा अंध:कार आता दूर करणार मशाल, असे वाक्य त्यावर लिहिले आहे. त्यात सर्वात खाली बाळासाहेबांची मशाल असे वाक्य लिहले आहे. 19 जून, 1966 रोजी बाळासाहेबांचा जन्म झाला होता. तर 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले होते. त्यानंतर शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात आली. तर दोन अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली.
उद्धव ठाकरे यांचे जास्त उमेदवार
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील अनेक आमदार बाहेर पडले. शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे आणि भाजप यांनी महायुतीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिवसेनेतील दोन्ही गटात धुमश्चक्री सुरु असते. दोन्ही गट आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा करतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा दोन्ही गटांनी अनेक मतदारसंघात एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. अनेक ठिकाणी दोन्ही गटात चुरस आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी दोन्ही गोटाचे टेन्शन वाढवले आहे. शिंदे गट महाराष्ट्राच्या निवडणुकीत 81 ठिकाणी जागा लढवत आहे. तर उद्धव ठाकरे गटाने 95 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.