7.71 लाखांपैकी 1.89 लाख मुलांचे ‘अपार’ तयार,3 दिवसांची मुदत उरली:शिक्षण विभागासमोर साडेपाच लाख आयडी बनवण्याचे आव्हान
2 hours ago
2
पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे ‘अपार’ आयडी बनवण्याचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आहे. जिल्ह्यातील पावणेआठ लाख विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त १ लाख ८९ हजार ३२९ विद्यार्थ्यांचे अपार कार्ड काढले आहेत. आणखी साडेपाच लाख विद्यार्थ्यांचे कार्ड काढण्यासाठी फक्त ३ दिवसांचा कालावधी उरल्याने शिक्षण विभागाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ४ हजार ७१७ शाळांमधील पहिली ते बारावीचे एकूण ७ लाख ७१ हजार ८०१ विद्यार्थी आहेत. केंद्र शासनाने यू-डायस प्रणालीमधून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत दिली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे. जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आल्याने शाळांकडून आवश्यक माहितीची मिळवण्याची धडपड सुरू झाली आहे. याबाबत केंद्र सरकारकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रॅमर व तालुकास्तरावरील डेटा एन्ट्री ऑपरेटर व एमआयएस को-ऑर्डिनेटर यांना प्रशिक्षण देण्यात आले असून सर्व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्याचे कळवले आले आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ६ नोव्हेंबर रोजी आढावा बैठक झाली. विभागीय शिक्षण उपसंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांकडून घेतले संमती पत्र : अपार आयडी बनवण्यासाठी पालकांचे संमती पत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेकडून पालकांशी संपर्क करून त्यांच्याकडून संमतीपत्र मागण्यात येत आहे. जसजसे संमतीपत्र प्राप्त होईल तसतशी यादी परीपूर्ण होईल. मुदत वाढण्याची शक्यता दिवाळीच्या सुट्या नंतर विधानसभा निवडणूकीत शिक्षक मोठ्या प्रमाणात अडकले होते. त्यामुळे या कामासाठी खूप त कमी वेळ मिळाला, काम अधिक असल्याने कदाचीत मुदत वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पावणेआठ लाख विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८९ हजार ३२९ विद्यार्थ्यांना आयडी मिळाला आहे.’’ कादर शेख, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, सोलापूर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)